शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेलगाव रोड भागात २५ दिवसांपासून निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:47 IST

मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.

ठळक मुद्दे‘पाणी दो’ आंदोलनाचा इशारा : महिला थेट कलेक्टर कचेरीत; सहयोगनगर, जिजामाता चौक परिसर सोडला वाऱ्यावर

बीड : मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग, भांडवले गल्ली, आमेर कॉलनी, मिल्लत नगर, पापनेश्वर मंदिर परिसर, तेलगाव रोड, निमरा कॉलनी, मिल्लत नगर, अरीश कॉलनी व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे.नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे ही टंचाई निर्माण झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तेलगाव रोडवरील राष्टÑीय महामार्गावर मुख्य रस्त्यावर पाणी दो आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती खुर्शीद आलम यांनी दिला आहे. येथील नागरिक नगर पालिकेच्या पाण्यावर मुख्यत: अवलंबून आहेत. ते पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करत आहेत. त्यांना नगरपालिकेकडून पाणी मिळणे आवश्यक आहे, मात्र पालिकेच्या यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खुर्शीद आलम यांच्यासह, इलियास सेवक, जलीलभाई, जाफरभाई, रफिकभाई, नसीरभाई, नविद भाई, सगीर भाई, इिम्तयाज भाई, चांद भाई, पप्पूभाई, मुजीब भाई, बिलाल भाई, सईद भाई, रवि भैय्या, महेश भैय्या आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.मोहंमदिया कॉलनी व लगतच्या भागात तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरदूर शोधाशोध करावी लागत आहे. दिवसभर पाण्यासाठी ताटकळावे लागत असून, दैनंदिन कामकाजावरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याने या प्रश्नावर मंगळवारी संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.पाणी उपलब्ध असताना अनियमितता मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नगरपालिका जाणीवपूर्वक पाणीपुरवठा करीत नसल्याचा नागरिकांना आरोप आहे. जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देऊन नियोजनानुसार ११ दिवसांआड सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला सूचना करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.पाणीपुरवठा सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा मोहंमदिया कॉलनी, आरेफ कॉलनी, सय्यद अलीनगर, तसेच लगतच्या भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन