शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजी; सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 18:55 IST

Approved the no-confidence motion against the Speaker : परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला बबन गित्ते यांच्या विरोधात पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी बीड चे जिल्हाधिकारी यांच्याकडे 22 डिसेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

ठळक मुद्देयावेळी एकूण 11 सदस्यांपैकी 10 सदस्य उपस्थित होते.तर सभापती उर्मिला गित्ते ह्या गैरहजर होत्या.

परळी : येथील पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्या विरोधात गुरुवारी पंचायत समिती सदस्यांच्या  विशेष सभेत अविश्वास ठराव संमत झाला. ठरावाच्या बाजूने 11 पैकी 10 सदस्यांनी हात उंच करून पाठिंबा दिला. तर सभापती स्वतः गैरहजर राहिल्या. यावेळी तहसिल परिसरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त होता.

परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला बबन गित्ते यांच्या विरोधात पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी बीड चे जिल्हाधिकारी यांच्याकडे 22 डिसेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या ठरावावर विचार विनिमय करण्यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता परळी पंचायत समिती सदस्यांची एक विशेष सभा बोलवण्यात आली , पावणे आकरा वाजता तहसिल कार्यालयात  10 सदस्य आले. वेळेवर11 वाजता उपजिल्हाधिकारी तथा पीठासन आधिकारी नम्रता चाटे यांच्या उपस्थितीत विशेष सभेला प्रारंभ झाला. यावेळी एकूण 11 सदस्यांपैकी 10 सदस्य उपस्थित होते. तर सभापती उर्मिला गित्ते ह्या गैरहजर होत्या. त्यामुळे 10 सदस्यांनी  सभापती विरोधात अविश्वास ठराव हात उंच करून पारित केला. परळी तहसिल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता तसेच शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला होता. शांततेत अविश्वास ठरावाची प्रक्रिया पार पडली. 

राष्ट्रवादी आणि भाजप सदस्य एकत्र राष्ट्रवादी व भाजपाच्या सदस्यांनी एकत्रित येऊन सभापती उर्मिला गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित केला. या विशेष सभेकरीता पंचायत समिती, अंबाजोगाईचे  गटविकास अधिकारी एस.जी.घोनसीकर, परळीचे नायब तहसिलदार बाबुराव रुपनर उपस्थित होते. उर्मिला गित्ते ह्या नंदागौळ पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या. जनक्रांती सेनेचे संस्थापक बबन गीते यांच्या त्या पत्नी आहेत. डिसेंबर 2019 मध्ये त्यांची परळी पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाली होती. सभापतीपदाला एक वर्ष पूर्ण झाल्याने नवीन सदस्याला सभापती करण्यासाठी त्यांना पक्षाच्यावतीने सभापती पद सोडण्याची सांगितले होते. परंतु, त्यांनी पद न सोडल्यामुळे त्यांच्या वर अविश्वास ठराव आणला असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेस