विस्कळीत वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:22 AM2021-06-21T04:22:09+5:302021-06-21T04:22:09+5:30

... बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी वडवणी : तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी पेरणी करताना बीजप्रक्रिया करूनच पेरणी ...

Disrupted power supply, inconvenience to customers | विस्कळीत वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय

विस्कळीत वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय

Next

...

बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी

वडवणी : तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी पेरणी करताना बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उद्धव गर्जे यांनी केले आहे. बीज प्रक्रिया करीत असताना प्रारंभी बुरशीनाशक, त्यानंतर कीटकनाशके आणि शेवटी जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी, असेही त्यांनी सांगितले.

....

सेंद्रिय, जैविक खतांचा वापर करा

वडवणी : दिवसेंदिवस जमीनधारणा कमी होऊ लागल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रासायनिक सोबतच सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी. पीकनिहाय संतुलित खतांचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उद्धव गर्जे यांनी केले.

....

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा

वडवणी : पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, सिलिंडरचे वाढते दर सामान्य व गोरगरिबांना परवडणारे नाहीत. प्रचंड महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. यामुळे दर कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसीलदार प्रकाश सिरसेवाड यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी कॉ.लहू खारगे, बांधकाम कामगार नेते कॉ. ओम पुरी, कॉ. ज्योतीराम कलेढोण, कॉम्रेड ऋषिकेश कलेढोण, विष्णू सुरवसे आदी उपस्थित होते.

....

वीज उपकरणांपासून सावधान रहावे

वडवणी : तालुक्यात चार, पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने विद्युत उपकरणाला ओल्या हाताने स्पर्श करू नये. नागरिकांनी विद्युत खांबापासून सावधानता बाळगून आपल्या जीविताचे संरक्षण करावे, असे आवाहन महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोविंद मस्के यांनी केले. नैसर्गिक आपत्तीमुळे विद्युत खांब पडून किंवा विद्युत प्रवाहित असलेली तार तुटून, शॉर्टसर्किटने जीवितहानी, वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे धोकादायक विद्युत खांबाला कोणत्याही प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

....

लाकडाच्या वस्तू हदपार

वडवणी : शेतीच्या वहिवाटीसाठी लागणारे जुन्या पद्धतीचे लाकडी अवजारे आता हद्दपार होताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील स्थानिक लोहार, सुतार, कारागीर व्यवसाय हे धोक्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मशागतीला सुरूवात करण्यापूर्वी औत, मोगडा, जुआटी, जुन्या औतांना दांडी बसवणे, हे मोडीस निघाले असून शेतकरी मशागतीसाठी जवळपास आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने व लोखंडी वस्तूने शेती कामे करीत आहेत.

Web Title: Disrupted power supply, inconvenience to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.