शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तू तू-मै मै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 8:22 PM

येथील ११ वैद्यकीय अधिका-यांनी गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याविरोधात उपसंचालकांकडे तक्रार केली होती

बीड : रजेच्या अर्जावरून जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड व वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव चिंचोले यांच्यात तू तू-मै मै झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. गुरूवारीच चिंचोले यांच्यासह ११ वैद्यकीय अधिका-यांनी तक्रार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हा रुग्णालय सध्या वादग्रस्त ठरू पाहात आहे. येथील ११ वैद्यकीय अधिका-यांनी गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याविरोधात उपसंचालकांकडे तक्रार केली होती. शुक्रवारी पुन्हा वाद झाला. डॉ.राठोड हे आपल्या कक्षात बसलेले होते. डॉ.चिंचोले हे रजेचा अर्ज घेऊन त्यांच्याकडे गेले. याचवेळी त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर चिंचोले हे अर्ज टेबलवर ठेवून निघून गेले. या प्रकरणाची आरोग्य विभागात वा-यासारखी माहिती पसरल्याने दिवसभर याची चर्चा होती.वैद्यकीय अधिका-यांचीही चूक

गुरूवारी तक्रार करणा-या डॉक्टरांपैकी काही डॉक्टर हे शासकीय सेवेत असतानाही खाजगी सेवा देत असल्याचे समोर आलेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी व्यवसायरोध भत्ताही घेतलेला आहे. याची नोटीस बजावल्यानेच काहींनी राग काढल्याची चर्चा आहे. आता चौकशीतूनच नेमका खरा  प्रकार काय? हे समोर येणार आहे.रजेसाठी अर्ज आला होता. ३० व ३१ डिसेंबरला त्यांची ड्यूटी असल्याने रजा नाकारली. याबाबत लेखी पत्र काढले जाईल. याची उपसंचालकांना माहिती दिली जाणार आहे.- डॉ.सुखदेव राठोड,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीडरजेसाठी मी अर्ज घेऊन गेलो होते. मला रजा नाही म्हणले. मी नियमानुसारच रजा मागितली होती. रजा नाकारल्याने मी टेबलवर अर्ज ठेवून निघून आलो. रजा न देणे, म्हणजे आमच्यावर अन्याय आहे.- डॉ.महादेव ंिचंचोले, वैद्यकीय अधिकारी, बीड

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टर