शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'झेडपी'च्या खाकीत शिकलेला दिलीप आता चमकणार फौजदाराच्या 'वर्दीत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 17:54 IST

आंबेजोगाई तालुक्यातील बाभळगाव या छोट्याशा गावातील रहिवाशी

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षण घेतले जिल्हा परिषद शाळेत पीएसआय परीक्षेत एनटी ( ड ) प्रवर्गातून राज्यात प्रथम

अंबाजोगाई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या २०१८ च्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत दिलीप विलास सोनवणे या युवकाने एनटी ( ड ) प्रवर्गातून राज्यात प्रथम येत बाजी मारली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या दिपकने जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर मिळवलेल्या या यशाने बीड जिल्हावासीयांची  मान राज्याच्या नकाशावर उंचावली आहे.

दिलीप विलास सोनवणे हा आंबेजोगाई तालुक्यातील बाभळगाव या छोट्याशा गावातील रहिवाशी आहे. त्याचे वडील मार्केट कमिटीत असून आई गृहिणी आहे. तो येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आहे. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याची वाट धरली. येथे त्याने प्रचंड मेहनत करून जिद्दीच्या बळावर २०१८ साली घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत परीक्षेत घवघवीत यश मिळवले. अत्यंत कठीण परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या  शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या दीपकने राज्यात भटक्या जमाती (ड) या प्रवर्गातून राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्याच्या या यशाने बाभळगावकरांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा. डॉ.बिभीषण फड, सीआयडी पोलिस अधीक्षक लता फड, डॉ. सूर्यकांत मुंडे, माजी सभापती शिवहार भताने, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, दीपक तांदळे, साहेबराव फड, प्रा.बिभिषण चाटे, प्रा.आशा चाटे, शिक्षक प्रदीप चाटे आदींनी त्याचे स्वागत केले आहे.

दिलीप लहानपणापासूनच अत्यंत अभ्यासू व प्रामाणिक विद्यार्थी होता. प्रत्येक विषय समजून घेण्याकडे त्याचा कल असे. त्याच्या यशाने आमच्या शाळेचा आनंद द्विगुणीत केला आहे.- शिवहार भताने, मार्गदर्शक शिक्षक

टॅग्स :PoliceपोलिसStudentविद्यार्थीBeedबीड