शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

एकाचवेळी २५० कंटेनरचे लक्ष्मीपूजन; उसतोड मंजुरांच्या मुलांनी कष्टाने गावाची ओळख बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 12:26 IST

२५० कंटेनरचे गावात तर २०० कंटेनरचे देशभरात लक्ष्मीपूजन; सावंगी गावच्या उसतोड मंजुरांच्या मुलांकडे एकूण 450 कंटेनरची मालकी

- मधुकर सिरसटकेज (बीड): उसतोड मजुरांचा बीड जिल्हा म्हणून लागलेला कलंक पुसण्याचा विडा केज तालुक्यातील सांगवी (सारणी) येथील तरुणांनी उचलला असून या गावातील तरुणांकडे आज तब्बल 450 कंटेनरची मालकी आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी त्यापैकी 250 कंटेनर गावात होते. याची सामूहिकरित्या पूजा हभप अर्जुन महाराज लाड, हभप प्रकाश महाराज साठे,सरपंच संजय केदार,आणि जेष्ठ नेते दत्ता धस यांच्या हस्ते रविवारी  सायंकाळी करण्यात आली. 150 कंटेनर माल वाहतुकीच्या निमीत्ताने देशाच्या विविध भागात असल्यामुळे त्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे लक्ष्मीपूजन केले.

केज तालुक्यातील सांगवी (सारणी) हे गाव तसे अहमदपूर-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गालगत असलेले खेडे आहे. या गावची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या आसपास आहे. 1995 ते 2000 या दरम्यान गावातील काही तरूण विविध प्रकारच्या गाड्यांवर क्लीनर म्हणून काम करीत होते. त्यातूनच 2001 साली गावातील 15 युवक चालक बनले. दरम्यान, काहींनी स्वतःच्या गाड्या घेतल्या तर काहींनी दुसऱ्यांच्या गाडीवर  चालक म्हणून काम करु केले. छत्रपती संभाजीनगर येथील पुष्पक ट्रान्सपोर्टमध्ये अनेकजण चालक म्हणून कामाला लागले.

2015 साली पहिला कंटेनर, आज 450 रामेश्वर केदार हे 2015 साली सांगवीतील पहिले कंटेनर मालक झाले. त्यानंतर गावात कंटेनर घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. आज सांगवीतील उसतोड मंजुरांच्या मुलांकडे एकूण 450 कंटेनरची मालकी असल्याची माहिती जेष्ठ नेते दत्ता धस यांनी दिली.

सालगड्याचा मुलगा 20 कंटेनरचा मालकगावातील बाबुराव केदार हे निरक्षर आहेत.त्यांचे वडील गावातच सालगडी म्हणून काम करायचे. शिक्षणासाठी पैसे नव्हते, तुटपुंज्या शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता त्यामुळे कंटेनरवर आधी क्लीनर आणि नंतर चालक झाले. त्यानंतर स्वतः या व्यवसायात प्रवेश केला. एका कंटेनरने सुरुवात करत आज तब्बल 20 कंटेनर त्यांच्या मालकीचे आहेत. बाबुराव केदार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तर 20 चालक, 20 क्लीनर मिळून 40 कामगार कामाला असल्याची माहिती केदार यांनी दिली. 

निर्व्यसनीपणामुळेच प्रगतीसांगवी गावात 450 कंटेनरवरील चालक आणि क्लीनर काम करणारे युवक हे निर्व्यसनी आहेत. निर्व्यसनी राहणे हेच आमच्या प्रगतीचे व विकासाचे खरे गुपित असल्याचे अप्पासाहेब धस यांनी सांगितले. 

दरदिवशी कोटीवर उलाढालगावातील 20 ते 25 मालकांचे मिळून एकूण 450 कंटेनर आहेत. त्यासाठी 22 ते 25 रोडलाईन्सची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी नाशिक येथे 2, पुणे येथे 3, छत्रपती संभाजीनगर येथे 1 तर उर्वरित 19 रोडलाईन्सचे कार्यालय सांगवी (सारणी) येथील फाट्यावरच आहेत. यांची सर्वांची वर्षभराची उलाढाल एक ते सव्वा कोटीची होते. - संजय केदार, सरपंच

रात्री उशीरापर्यंत चालली पूजाभगवान बाबा सोशल फौंडेशन आणि सांगवी ग्रामपंचायतीच्यावतीने रविवारी रात्री गावातील 25 ट्रान्सपोर्ट मालकांचा व नव्याने कंटेनर खरेदी केलेल्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी 250 कंटेनरची गावाबाहेरील एका शेतात हभप अर्जुन महाराज लाड, हभप प्रकाश महाराज साठे, सरपंच संजय केदार आणि जेष्ठ नेते दत्ता धस यांच्या हस्ते सामूहिक लक्ष्मीपूजन करण्यात आले.

टॅग्स :BeedबीडDiwaliदिवाळी 2023Sugar factoryसाखर कारखाने