शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बीड जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:16 AM

ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य पातळीवर सुरु असलेल्या आंदोलनांतर्गत मंगळवारी येथील जिल्हा परिषदेसमोर जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी दिवसभर धरणे आंदोलन केले.

बीड : ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य पातळीवर सुरु असलेल्या आंदोलनांतर्गत मंगळवारी येथील जिल्हा परिषदेसमोर जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी दिवसभर धरणे आंदोलन केले. तर मागण्या मान्य न झाल्यास २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यभर असहकार व काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६राज्य संघटना व जिल्हा शाखेच्या माध्यमातून शासनपातळीवर वारंवार प्रयत्न केलेला आहे. मागण्या मान्य न झाल्याने ९ आॅगस्टपासून वेगवेगळ्या टप्प्यावर ग्रामसेवक संघटनेने असहकार व काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करुन फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी. ग्रामसेवक संवर्गाला प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदलून पदवीधर ग्रामसेवक नेमणूक व्हावी, २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सज्जे तसेच पदे वाढवावीत, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर करावी. २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करणे, आदर्श ग्रामसेवक राज्य, जिल्हास्तर आगाऊ वेतनवाढ करुन एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करणे, ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामे कमी करणे या मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेसामेर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, जिल्हा सरचिटणीस भगवानराव तिडके, मधुकर शेकळे, एस. के. देशमुख, बी. जी. राठोड, मधुकरराव चोपडे, मनोहर जाधव, डी.बी. मिसाळ, दत्तात्रय नागरे,एस.एम. चव्हाण, ए.व्ही. पुजारी यांच्यासह तालुक्यांचे पदाधिकारी, ग्रामसेवकआंदोलनात सहभाग घेतला.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदagitationआंदोलन