शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

धनंजय मुंडेंनी भाचीच्या लग्नात धरला ठेका, 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर थिरकताना दिसले धनुभाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:04 IST

तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राजकीय वैर विसरुन एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. इतरवेळी एकमेकांवर आरोप करणारे बहिण-भाऊ यावेळी राजकारण विसरुन मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले.

बीड: राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा लग्नामध्ये झिंगाट डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये धनुभाऊचा दिलखुलास अंदाज पाहायला मिळत आहे. यात धनुभाऊंचा दिलखुलास अंदाज एका लग्नात पाहायला मिळाला आहे. 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर नवरदेव आणि नवरीसोबत धनंजय मुंडे थिरकले आहेत.

इतरवेळी नेत्यांना विविध मुद्द्यांवरुन आक्रमक होताना किंवा गंभीर मुद्रेत आपण पाहत असतो. पण, काहीवेळा हेच नेतेमंडळी सार्वजनिक आयुष्य विसरुन खासगी आयुष्य मनसोक्त जगताना दिसतात. यात धनंजय मुंडेदेखील मागे नाहीत. नुकताच धनंजय मुंडे यांच्या भाचीचा लातूरमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. यावेळी एक वेगळेच धनंजय मुंडे लोकांना पाहायला मिळाले. 

लातूरमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रेंच्या लग्नासाठी धनंजय मुंडे सकाळपासूनच उपस्थित होते. हॉटेल कार्निवलमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यात तेजश्री केंद्रे आणि शरद सोनहीवरे लग्नाच्या बेडीत अडकले. दुपारनंतर या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आईंसोबत हजेरी लावली होती. दरम्यान याच विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे यांनी वधू आणि वरासबोत एका गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. 

पंकजा मुंडेंसोबत गप्पातीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राजकीय वैर विसरुन एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. इतरवेळी एकमेकांवर आरोप करणारे बहिण-भाऊ यावेळी राजकारण विसरुन मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. याआधीही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेकदा काही कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. पण, इतकावेळी त्यांनी सोबत घालवल्याचे मागील काही वर्षांमध्ये पाहण्यात आले नाही. भाचीच्या लग्नामध्ये बहिण-भावाने गप्पा तर मारल्याच, पण एकत्र बसून जेवणदेखील केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडlaturलातूरPankaja Mundeपंकजा मुंडे