शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर है...', धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 18:29 IST

महाविकास आघाडीची लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल होत आहे.

बीड- 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत येत्या 9 तारखेला पक्षाची अहमदनगर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी आज बीडमध्ये राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातून पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाच्या विचाराला मानणारे नागरिक अशा सर्वांनी शरद पवारांच्या सभेसाठी अहमदनगरला उपस्थित राहावी, असे आवाहन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

आगामी काळातल्या निवडणुकांच्या व राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्वाची असून, या सभेला अहमदनगर जिल्ह्याला लागून असलेल्या बीड जिल्ह्यातून देखील हजारो नागरिक संमिलीत व्हावेत, याचे नियोजन करण्यासाठी पूर्व आढावा बैठकीचे आयोजन बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीस आ.धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले, त्याचबरोबर आ.प्रकाश सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.संजय भाऊ दौंड, विजयसिंह पंडित यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

दिल्ली आणखी माझ्यासाठी खूप दूर आहे - धनंजय मुंडेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत अहमदनगर येथील सभेबाबत माहिती देत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांच्या एका व्हायरल यादीचा संदर्भ देत तुम्ही लोकसभा लढणार का? असा प्रश्न केला, त्यावर धनंजय मुंडे यांनी आपल्यासाठी दिल्ली आणखी खूप दूर आहे, असे उत्तर दिले. 

धनंजय मुंडे म्हणाले की, माझी माझ्या पक्षाला एक कार्यकर्ता म्हणून राज्यात अधिक उपयुक्तता आहे, त्यामुळे पक्ष मला लोकसभा लढायला लावणार नाही. बीड लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने विजयी व्हावे, हे आमचे लक्ष्य आहे, हे निश्चितच सत्य आहे, मात्र मी स्वतः उमेदवार असेल, ही चर्चा पूर्णपणे चुकीची आहे, असे धनंजय मुंडे स्पष्टपणे यांनी सांगितले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडlok sabhaलोकसभा