शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Result : धनंजय मुंडेंवरील आरोपांचा मतदानावर परिणाम नाही; परळीतील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By सुमेध उघडे | Updated: January 18, 2021 12:19 IST

Maharashtra Gram Panchayat Result : सात ग्रामपंचायती पैक्की २ ग्रामपंचायत बिनविरोध राखण्यात यश

ठळक मुद्देनिकालानंतर जगमित्र या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विजयी उमेदवारांचा जल्लोषनिवडणूक काळात धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाचा राष्ट्रवादीच्या मतांवर परिणाम नाही

परळी ( बीड ) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसधनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. त्यामध्ये ६ ग्रामपंचायत पैकी पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनजय मुंडे यांच्या  नेतृत्वाखाली पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. तर भोपळा या एका ग्रामपंचायत मध्ये भाजपनेते प्रा टी पी मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा प्रीतम मुंडे यांच्या मार्गर्शनाखाली पुरस्कृत पॅनलचा विजय प्राप्त झाला आहे.  या निवडणूक निकालामुळे धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाचा राष्ट्रवादीच्या मतांवर परिणाम न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा ,सर्फराजपूर , भोपळा, गडदेवाडी , रेवली येथील ग्रामपंचायतीच्या 42 जागेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले याचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला . लाडझरी सर्फराजपुर ,गडदे वाडी, येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल ला यश मिळाले तर  मोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस -भाजप पुरस्कृत पॅनल विजय मिळाला आहे.. रेवली येथे एका जागेसाठी मतदान झाले होते  त्यात अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर या कालावधीतच अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना घेरण्याचा पर्यंत केला. मात्र, मतदानावर याचा परिणाम झाला नसल्याचे आज आलेल्या निकालावरून दिसून आले आहे.

तसेच  वंजारवाडी  ग्रामपंचायत  यापूर्वीच बिनविरोध झाली आहे ,रेवली,    वंजारवाडी   ही राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात असल्याचे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.. भाजपा नेते प्रा टी पी मुंडे यांच्या मार्गर्शनाखाली अनेक वर्षा पासून असलेली भोपळा ग्रामपंचायत  या वेळी त्यांच्याकडेच राहिले आहे .निकालानंतर जगमित्र या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू आहे. 

 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडgram panchayatग्राम पंचायत