शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, माझ्या दावेदारीचा प्रश्न नाही : पंकजा मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 17:54 IST

मी राज्यभर फिरणार, परळीची लढाई अटीतटीची नाही

- धर्मराज हल्लाळे  

परळी (जि. बीड) : भगवानबाबा गडावर आलेल्या जनतेचा उत्साह मी समजू शकते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घेतले, हा मला मिळालेला मोठेपणा आहे; परंतु, माझ्या मनात किंचितही इच्छा नाही. येणारे सरकार आमचे असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील, असे स्पष्ट करीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दावेदारी सांगणे ही भाजपची संस्कृती नसल्याचे म्हटले आहे. 

‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, भगवानबाबा गडावर सबंध राज्यातून लोक येतात. इथे आलेल्या काही तरुणांनी उत्साह दाखविला. २०१४ मध्ये आणि पुन्हा आता अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात लोकभावना समोर आली. ते काही कार्यकर्ते नव्हते. 

कार्यकर्त्यांची भावना आहे, मग तुमची भावना काय?जनतेच्या भावनेचा आदर केला पाहिजे. परंतु, मला दावेदार दाखविले जात असेल  तर ते चुकीचे आहे. २०१४ मध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, हे मला माहीत होते. ते कर्तृत्ववान आहेत. त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे पक्षानेही फडणवीस यांचेच नेतृत्व राज्यात मान्य केले आहे.

भविष्यातही दावा नाही का?  

पक्ष मोठा आहे. संघटन मोठे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व लाभले आहे. त्यांना सगळ्यांच्या क्षमता आणि भविष्य माहीत आहे. त्यांना दूरचे कळते. शिवाय, दावा करायला माझी व्यक्तिगत मालमत्ता नाही. त्यामुळे अकारण नवीन चर्चा वाढवू नये.

निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणे सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचे ठरले का? गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. शरद पवार यांचे राजकारणही प्रदीर्घ व मोठे आहे. ते अनुभवी आहेत. त्यांना गुन्हा  आत्ताच दाखल का झाला, हे कळते. त्यात सरकारचे राजकारण नाही. 

मतदारसंघातच तुम्ही अडकलात का? मी राज्यभर सभा घेत आहे. माझ्यासाठी परळीची लढाई अटीतटीची नाही. मराठवाड्यातील नेतृत्वाला डावलले जाते का? तिकीट वाटपात नाराजी झाली? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, नेतृत्व मराठवाड्यातील असो, विदर्भातील की पश्चिम महाराष्ट्रातील. ते ब्रेक करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तसे झाले, तर ते अजून मोठे होते हा इतिहास आहे. मुळात तसे घडलेले नाही. तसेच तिकीट वाटपात युती करणे याला प्राधान्य होते. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी झाली. ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी स्वत: पुढे येऊन निर्णय मान्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा ते उगाळणे नको.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र