शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे करून दाखवावी लागतात - जयदत्त क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:06 IST

बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी बोरफडी येथे केले.

बीड : बाजारात आपण एखादी वस्तू खरेदी करताना सर्व बाजूने विचार करून खरेदी करतो. तसेच मतदान करताना देखील चौकस बुद्धी ठेऊन मतदान करावे लागते. विकासकामे करून दाखवावी लागतात. ती बोलल्याने किंवा फेकाफेकी केल्याने होत नसतात. बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी बोरफडी येथे केले.बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी कॉर्नर बैठका घेत डोंगरपट्टा पिंजून काढला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, सुशिल पिंगळे, पंजाब काकडे, गणेश वरेकर, राणा डोईफोडे, बप्पासाहेब घुगे, तात्या डोईफोडे, अरूण डाके, शिवानंद कदम, डॉ.आंधळे, सखाहरी गदळे, तुळशीराम महाराज, उत्तमराव महाराज, महादेव घुगे आदिंची उपस्थिती होती.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, डोंगरपट्ट्यातील बोरफडी येथील ग्रामस्थांनी जेव्हा जेव्हा विकासाच्या कामाची मागणी आणि हट्ट धरला. तेव्हा तेव्हा त्यांच्या मागणीला प्राधान्य देण्याचे काम आपण केले. शिक्षण, आरोग्य आणि डोंगरी भागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम आपण केले. मिळालेल्या खात्याच्या माध्यमातून जनतेला आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे काम आपण केले.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे म्हणाले की, शिवसैनिकांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आहे. जिवाचे रान करून जयदत्त क्षीरसागरांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे. खांद्यावर बाण घेतलेल्या जयदत्त क्षीरसागरांना थेट मंत्रालयामध्ये पाठवायचे आहे. त्यासाठी आपण मदतीचा खारीचा वाटा उचला असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुशील पिंगळे, डी.एस.कदम, अरूण बोंगाने, साहेबराव पोकळे, परमेश्वर घुमरे, तात्या डोईफोडे, सुरेश घुगे, झुंजार धांडे, लालासाहेब घुगे, विलास कुटे, महादेव घुगे यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सोंगंढोंगं करणाऱ्यांना बाजूला साराया निवडणुकीत आपल्याला संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याचे काम आपण करू. या भागातील ऊसतोड मजूर हातात कोयता घेऊन जीवन जगतो. तो कोयता घेणारा शेतकरी बागायतदार झाला पाहिजे. विकासकामे जलदगतीने करायची असतील तर सोंगंढोंगं करणाºयांना बाजूला सारा, गट -तट विसरून धनुष्यबाणाला मतदान करा. विकास बोलून होत नाही तो करून दाखवावा लागतो असे यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर