शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याने बांधकामासाठी खोदला खोल खड्डा; चार मजली इमारत त्यात पत्त्यासारखी कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 18:55 IST

शेजारच्या इमारतीचे खोदकाम भरपूर खोल असल्याने बाजूची इमारत एका बाजूला झुकल्याचे नागरिकांना दिसून आले.

बीड : शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रेहमत नगर येथील एका घराचे बांधकाम करण्यासाठी खूप खोल खड्डा खोदल्याने शेजारी असलेली चार मजली इमारत अक्षरक्षः पत्त्यासारखी कोसळल्याची घटना बुधवारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. झुकलेली इमारत पडण्यापूर्वीच नगर परिषद विभागातील कर्मचाऱ्यांनी वेळीच या भागातील एसबीआय बँक, दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या तर प्रभावित इमारतीशेजारीत घरातील नागरिक इतर ठिकाणी हलविण्यात आल्याने जीवितहानी टळली. या प्रकरणाची गंभीर दखल नगर पालिकेने घेतली असून, प्रत्येक बाजूने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

रेहमत नगर येथे अब्दुल जमाल अब्दुल गणी यांच्या चारी मजली इमारतीचे काम सुरू आहे तर त्यांच्या बाजूला शेख हारुण शेख ईसाक यांच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. हे खोदकाम भरपूर खोल असल्याने बाजूची इमारत एका बाजूला झुकल्याचे या भागातील नागरिकांना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास दिसून आले. काही लोकांनी या घटनेची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासन, नगर पालिका प्रशासन व पोलिसांना दिली. माहिती प्राप्त होताच नगर परिषद मुख्याधिकारी उमेश ढाकणे, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळावर तत्काळ गेले. परिस्थिती पाहता, अग्निशमन विभागालाही बोलाविण्यात आले. इमारत एका बाजूला झुकलेली असल्याने ती काही वेळातच पडेल, असा अंदाज असल्याने कर्मचाऱ्यांनी या भागातील एसबीआय बँक, दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच जवळपासच्या घरातील सदस्यांनाही इतरत्र जाण्याचे सांगण्यात आले. वेळीच सावधानता बाळगल्याने एकही जीवितहानी झाली नाही. मात्र, जवळच्या एका घरावर इमारतीचा काही भाग पडल्याने किचन व एका रूमचे नुकसान झाले.

चौकशी झाली सुरूशहरातील मुख्य भागात इमारत कोसळलेल्या घटनेची गंभीर दखल नगर पालिकेने घेतली आहे. दोन्ही जागा मालकांना नोटीस बजावली आहे. नगर रचनाकार यांच्याकडून इमारत बांधण्याचा परवाना घेतला आहे का ?, कोणत्या इंजिनिअरच्या अधिपत्याखाली हे बांधकाम सुरू होते ? यासह इतर प्रश्न नोटिसीद्वारे विचारण्यात आले आहेत. दोघांकडून नोटिसीचे उत्तर मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेटइमारत कोसळलेल्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा अहवाल देऊन कारवाईच्या सूचना नगर परिषद मुख्याधिकारी ढाकणे यांना देण्यात आल्या आहेत. तसेच बीड तहसीलदार सुहास हजारे यांनीही वेळीच नगर परिषद व शासकीय यंत्रणांना सूचना दिल्या.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात