गेल्या दीड वर्षापासून स्वाराती रुग्णालयात कोरोना रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहेत. रुग्णालयास शासन सर्व पुरवठा करीत आहेत. तरीही ज्या महत्त्वपूर्ण साहित्याची नितांत आवश्यकता आहे, अशा अनेक वस्तू व गरजेचे साहित्यही रुग्णालयास लोकसहभागातून मदत म्हणून दिले जात आहे. गुरुवारी येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीधारीलाल भराडिया यांच्यावतीने फ्रीज, तर भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, श्रेणिक कात्रेला, सुमीज सुनील मुथा, विशाल सोमवंशी, यश बडेरा यांच्यावतीने स्वछता व फरशी पुसणाऱ्या १० मशीन, मोठे व छोटे १४ डस्टबीन, चार सॅनिटायझर कॅन व फरशी पुसण्यासाठी लागणारे डिसइन्फेक्शन लिक्विड असे साहित्य देण्यात आले.
हे सर्व साहित्य प्रभारी अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर, कोरोना कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांच्याकडे सुपूर्द केले. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, गिरीधारीलाल भराडीया, प्रसाद चिक्षे, डॉ. अनिल मस्के, डॉ. विशाल लेडे, सुनील मुथा, धनराज सोळंकी, सुमीज मुथा, श्रेणिक कात्रेला आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
030621\20210603_141218_14.jpg