शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

दिवसाढवळ्या लुटमार; पोलीस असल्याची बतावणी करून ट्रकचालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 3:42 PM

The truck driver was robbed by fake police at Ambajogai भर वस्तीजवळ दिवसाढवळ्या होणाऱ्या लुटीच्या घटनांनी चोरटे निर्ढावल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअंबासाखर उड्डाण पुलाजवळील घटना 

अंबाजोगाई : पोलीस असल्याची बतावणी करत तीन भामट्यांनी तपासणी करण्याच्या बहाण्याने ट्रकला अडविले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत ते भामटे ट्रक मधील ८६ हजार रुपये घेऊन पसार झाले. ही घटना रविवारी  (दि.२८) दुपारी अंबासाखर उड्डाणपुलाच्या जवळ घडली. मागील महिन्यातच लोखंडी सावरगाव जवळ लातूरच्या व्यापाऱ्याच्या चालत्या कारवरील बॅग लंपास करून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लुटला होता. त्या चोरीचा तपास प्रलंबित असतानाच रविवारी भरदुपारी १२ वाजता पुन्हा लुटीची घटना घडल्याने अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. 

अधिक माहिती अशी कि, बनवारीलाल दुर्गाप्रसाद शर्मा (रा. शिबीपुरी, आग्रा, उत्तर प्रदेश) हा ट्रकचालक रविवारी त्याच्या ट्रकमध्ये (आरजे ११ जीव्ही २०३७) लातूरच्या व्यापाऱ्याचा माल घेऊन उत्तर प्रदेशात जाण्यासाठी निघाला होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्याचा ट्रक लातूर - लोखंडी सावरगाव मार्गावर अंबासाखर उड्डाणपुलाच्या पुढे आला असता पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ट्रकला अडविले. आम्ही पोलीस आहोत, ट्रकची झडती घ्यायची आहे अशी बतावणी करून त्यांनी चालकासह त्याचा मुलगा आणि हेल्परला खाली उतरविले. त्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये सीटच्या पाठीमागे पेटीत ठेवलेले रोख ८६ हजार रुपये काढून घेतले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी देऊन ते तिघेही पसार झाले. याप्रकरणी ट्रकचालक बनवारीलाल याच्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

महिन्यातील दुसरी घटना मागील महिन्यात लग्नाहून परतणाऱ्या गटागट कुटुंबियांची कार रात्री ११ वाजता लोखंडी सावरगाव जवळील कळंब टी रस्त्याजवळ आली असता चोरट्यांनी कारच्यावर बांधलेल्या बॅगा काढून घेत तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीचा तपास अद्याप प्रलंबित आहे. रविवारी दुपारी पुन्हा ट्रक चालकाला लुटण्यात आले. भर वस्तीजवळ दिवसाढवळ्या होणाऱ्या लुटीच्या घटनांनी चोरटे निर्ढावल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड