शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

अंबाजोगाईत दामिनी पथकाची रोडरोमियोंवर कडक कारवाई; खाजगी शिकवणीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची केली सक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 20:06 IST

खाजगी शिकवणींच्या परिसरातील वाढते छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथकाने जोरदार मोहीम उघडली आहे

अंबाजोगाई (बीड) : खाजगी शिकवणींच्या परिसरातील वाढते छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथकाने मोहीम उघडली असून रविवारी एकाच दिवसात १४ जणांवर प्रतिबंधक तर ६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यासोबतच खाजगी शिकवणीच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्याची सक्ती करण्यात आली आहे.   खाजगी शिकवणी परिसरात मुख्यत्वे आनंद नगर भागात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार गंभीर स्वरूप धारण करू लागले आहेत. मागील आठवड्यात यातूनच विनयभंग आणि हाणामारीचे प्रकार घडले. अश्या घटनांमुळे मुलींमध्ये आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे हि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाने कंबर कसली असून शाळा, महाविद्यालये आणि खाजगी क्लासेसच्या परिसरातून गस्त घालणे सुरु केले आहे. पोलीस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड यांच्याकडे या पथकाचे नेतृत्व असून पथकात महिला पोलीस गीते, वाहतूक पोलीस सोपने, पुरी, घोळवे यांचा समावेश आहे. 

रविवारी या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी १४ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तर ९ जणांना न्यायालयापुढे हजर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. बेफाम दुचाकीस्वारांवरही या पथकाचे लक्ष असून ट्रिपलसीट मोटारसायकल चालवणाऱ्या ६ महाविद्यालयीन युवकांवर दंडात्मक कारवाई करून बाराशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

खाजगी शिकवणी चालकांना सीसीटीव्हीची सक्ती खाजगी शिकवणी परिसरात घडणाऱ्या अप्रिय गोष्टींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत शहरातील सर्व खाजगी क्लासचालकांची शुक्रवारी पोलीस ठाण्यात बैठक घेतली. यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी पोलिसांनी खाजगी शिकवणी चालकांना शिकवणीच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्याची सक्ती केली. 

साध्या वेशातील पोलिसांची गस्त खाजगी क्लास परिसरातून दामिनी पथकासोबतच साध्या वेशातील पोलीसही गस्त घालणार आहेत. मोटारसायकल पेट्रोलिंग देखील करण्यात येणार आहे. तरीदेखील कुठे काही अप्रिय घटना होत असल्याचे आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.”- सोमनाथ गीते, पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई शहर टवाळखोरांची गय केली जाणार नाही विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी कायद्याचे पालन करावे. विद्यार्थिनींना आणि महिलांना त्रास होईल असे वर्तन करू नये. रहदारीचे नियम पाळावेत. जर कोणी युवक हुल्लडबाजी करताना पथकास आढळून आला तर त्याची गय केली जाणार नाही.पालकांनीही आपल्या पाल्याच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवावे. मदतीसाठी दामिनी पथकाच्या ८६६९३०३३०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.- देवकन्या मैंदाड, पोलीस उपनिरीक्षक

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAmbajogaiअंबाजोगाईPoliceपोलिस