शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचा क्रूर खेळ; आई-वडिलांना शेतात मदत करणाऱ्या बहीण-भावाचा वीज कोसळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 17:27 IST

दोघेही आई-वडिलांना शेतात कापूस लागवड करण्यात मदत करत होते

ठळक मुद्देपाऊस आल्याने आई- वडिल एका झाडाखाली थांबले होते त्या बाजूच्या झाडाखाली भाऊ-बहिण यांनी आसरा घेतला

वडवणी (जि. बीड) : पावसादरम्यान वीज कोसळून झाडाखाली उभे असलेले बहीण व भाऊ ठार झाल्याची घटना तालुक्यातील मोरवड येथे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. अशोक विष्णुपंत अंडील (१७) व पूजा विष्णुपंत अंडील (१६), अशी मयत बहीण-भावाची नावे आहेत. 

मोरवड येथील विष्णुपंत अंडील व त्यांची पत्नी शुक्रवारी दुपारी शेतात कापूस लागवड करतीत असताना मुलगा अशोक अंडील व मुलगी पूजा ही त्यांना मदत करीत होते. त्यादरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कापूस लागवड थांबवून दोघे बहीण- भाऊ हे आंब्याच्या झाडाखाली थांबले. दुसऱ्या झाडाखाली त्यांचे आई- वडील थांबले होते. साडेचार वाजेच्या सुमारास पावसादरम्यान वीज कोसळल्याने झाडाखाली थांबलेले अशोक आणि पूजा हे गंभीररीत्या भाजले. दोघांनाही तात्काळ वडवणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे दोघांना मृत घोषित करण्यात आले. 

दरम्यान, बीड जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तीन तालुके वगळता इतरत्र पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासात बीड ७.१, पाटोदा ११, आष्टी ७.१, गेवराई ३.७, शिरुर ३.३, वडवणी १०.८, अंबाजोगाई ३४.८, माजलगाव ९.३, केज ३३.९, धारुर २२.७ आणि परळी तालुक्यात १४ मि.मी. पावसाची नोंद झाली. एकूण १५७ मि.मी. पाऊस नोंदला असून सरासरी १४.३ आहे. आतापर्यंत एकूण ८१.५ मि.मी. पाऊस झाला.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीRainपाऊस