शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी अलोट गर्दी; ढोक महाराजांच्या कीर्तनाने स्मृती समारंभ सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:57 IST

''गोपीनाथराव वारकऱ्यांना ते वारकरी दिसत, साधकाला ते माय बाप तर अनाथला ते नाथ दिसत''

- संजय खाकरे

परळी (बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वारकऱ्यांवर प्रेम केले आहे , गोपीनाथराव मुंडे जाऊन 8 वर्ष झाले तरी विश्वास बसत नाही, गोपीनाथराव मुंडे हे अनाथाचे नाथ होते, असे भावोद्गार हभप रामनाचार्य  रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले. तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कीर्तन समारंभात ते बोलत होते. 

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच गोपीनाथ गडावर अलोट गर्दी झाली आहे. स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभाची सुरुवात रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या कीर्तनाने झाली. ढोक महाराज पुढे म्हणाले, गोपीनाथराव मुंडे आपल्या नसले तरी माजीमंत्री पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांच्या स्वरूपात ते कायम दिसतात. पंकजा मुंडे या झाशीच्या राणी सारख्या आहेत असे ही ढोक महाराज म्हणाले. 

सुर्योदय  व सुर्यास्त या नैसर्गिक घटना सारखे प्रत्येकाचे जीवन मरण ठरलेले आहे. मात्र, गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे आहे. गोपीनाथराव वारकऱ्यांना ते वारकरी दिसत, साधकाला ते माय बाप तर अनाथला ते नाथ दिसत होते, अशा शब्दात ढोक महाराज यांनी स्व. मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमास प्रज्ञा मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, प्रा. टी. पी मुंडे, फुलचंद कराड, राजेश देशमुख, नीलकंठ चाटे, विनायक गुट्टे, प्रकाश महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

दुपारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण येणार दरम्यान, गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण येणार आहेत. दुपारी त्यांच्या उपस्थितीत संघर्ष दिन सन्मान कार्यक्रम होईल.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाGopinath Mundeगोपीनाथ मुंडे