शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पावसा अभावी पिके करपली; पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचे आडस येथे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:24 IST

अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. या मागणीसाठी आडस येथील शिवाजी महाराज चौकात रास्तारोको केले. 

केज (बीड ) : तालुक्यातील होळ महसूल मंडळात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. खरीपाच्या पिकांची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत. या मागणीसाठी आडस येथील शिवाजी महाराज चौकात आज सकाळी साडेनऊ वाजता शेतकऱ्यांनी रास्तारोको केले. 

तालुक्यातील होळ महसूल मंडळात पर्जन्यमान कमी झाल्याने टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. थोड्याफार पडलेल्या पावसावर कशाबश्या खरीपाच्या पेरण्या करण्यात आल्या. मात्र पेरणीनंतर एक महिना संपला तरी पाऊस न पडल्याने या भागातील​ खरीपाची कापुस, सोयाबीन, तूर, मूग, बाजरी व मका ही कोवळी पिक पावसाअभावी करपली आहेत, तर कांही पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस नसल्याने पाणी पातळी खोल गेल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे परीसरातील शेतकर्‍यांनी बैलगाड्या रस्त्यावर सोडून आज आडस येथील शिवाजी महाराज चौकात सकाळी एक तास रास्तारोको आंदोलन केले. 

शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार नायब तहसीलदार एन.एम. शेख यांना देऊन रास्तारोको आंदोलन मागे घेतले. आंदोलनात रमेश आडसकर, राम माने, सरपंच बालासाहेब ढोले, उपसरपंच ओमकार आकुसकर, शिवरूद्र आकुसकर, बाळासाहेब देशमुख, राजेभाऊ पत्रवाळे, विकास काशिद, रमेश ढोले,  गफार पठाण, शिवाजी खडके, शाम गंगात्रे यांच्यासह परीसरात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसagitationआंदोलन