शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केतकी चितळेवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच; आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 14:41 IST

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली आहे.

अंबाजोगाई (बीड): ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमातून आक्षेपार्ह्य पोस्ट केल्या प्रकरणी अडचणीत आलेल्या केतकी चितळे हिच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात  गुन्हा नोंद करण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. दरम्यान, आज मंगळवारी (दि.१७) सकाळीच राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी  चितळेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर शरद पवार यांच्याबद्दल फेसबुक आणि ट्वीटरवर आक्षेपार्ह्य, बदनामीकारक आणि मानहानी करणारी पोस्ट केली होती. तसेच, संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी  केली होती. याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली. सध्या ती तुरुंगात असून १८ मे पर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही तिच्यावर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरुच आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या तक्रारीवरून केतकीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अंबाजोगाईत राष्ट्रवादीचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदरम्यान, मंगळवारी सकाळी अंबाजोगाई  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जेष्ठ नेते राजकिशोर मोदी, ताराचंद शिंदे, महादेव आदमाने, अमर देशमुख, तानाजी देशमुख, भिमसेन लोमटे, दत्ता सरवदे, सुधाकर म्हाले, सुगत सरवदे, जावेद गवळी, अकबर पठाण, इश्वर मुंडे यांच्यासह ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKetaki Chitaleकेतकी चितळेBeedबीड