शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘क्रिकेट फॉर पिस’ : पोलीस-नागरिक सुसंवादासाठी सोमवारपासून बीडमध्ये क्रिकेट स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 18:02 IST

‘पोलीस रेजिंग डे’च्या निमित्ताने बीड जिल्हा पोलीस दलाने ‘क्रिकेट फॉर पिस एक सामाजिक बांधिलकी’ यासाठी पुढाकार घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी या स्पर्धा सुरू होणार असून आठवडाभर त्या चालतील.

ठळक मुद्दे ‘पोलीस रेजिंग डे’च्या निमित्ताने बीड जिल्हा पोलीस दलाने ‘क्रिकेट फॉर पिस एक सामाजिक बांधिलकी’ यासाठी पुढाकार घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी या स्पर्धा सुरू होणार असून आठवडाभर त्या चालतील.मध्ये तब्बल ३५ संघ सहभागी झाले असून याची तयारीही अंतीम टप्प्यात आली आहे.

बीड : ‘पोलीस रेजिंग डे’च्या निमित्ताने बीड जिल्हा पोलीस दलाने ‘क्रिकेट फॉर पिस एक सामाजिक बांधिलकी’ यासाठी पुढाकार घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी या स्पर्धा सुरू होणार असून आठवडाभर त्या चालतील. यामध्ये तब्बल ३५ संघ सहभागी झाले असून याची तयारीही अंतीम टप्प्यात आली आहे. तसेच या स्पर्धेतून पोलीस-नागरिकांचा सुसंवाद वाढण्याविण्याही उद्देश आहे.

मागील वर्षापासून नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच बीड जिल्हा पोलीस दलालकडून नागरिक व पोलिसांचा संवाद वाढावा, त्यांच्यात स्नेह निर्माण व्हावा, या उद्देशाने क्रिकेट स्पर्धा घेण्याचे नियोजन केले. गतवर्षी दिवस-रात्र सामने खेळविण्यात आले होते. यावर्षी जिल्हा क्रीडा संकुल व पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सर्व सामने दिवसा खेळविले जाणार आहेत. २८ पोलीस ठाण्याचे २८ संघ, शहर वाहतूक शाखा, पत्रकार, वकिल, महसूल, कृषी, आरटीओ, पोलीस बॉईज अशा ३५ संघांचा यामध्ये सहभाग असणार आहे. 

१ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वा. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयावर या स्पर्धेचे उद्घाटन होईल. तर ५ जानेवारी रोजी सायं. ६ वा. या स्पर्धेचा समारोप होईल. समारोपाला पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांची प्रमुख उपस्थिती राहील. पोलीस अधीक्षक जी.श्रीधरसह अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत. या खेळाचा आनंद घेण्याबरोबरच खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी खेळाडू, क्रिडापेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख प्रा.प्रशांत जोशी, पोउपनि आर.टी.आमटे, कल्याण औटे, लक्ष्मण जायभाये, वसुदेव मिसाळ, शेख बाबर, अमोल ससाने, मनोज जोगदंड, बाबा निसरगंध आदींनी केले आहे.

बक्षिसांचा होणार वर्षावस्पर्धेत सहभागी होणार्‍यांसह विजेत्यांसाठी बक्षिसे ठेवली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रूपये रोख, चषक व उपविजेत्यास १० हजार रूपये रोख व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, यष्टीरकक्ष, क्षेत्ररक्षकसह मालिकाविरासही बक्षिसे दिली जाणार आहेत.