शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

११ वर्षांच्या कन्येची हिंमत! अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वतःच केली सुटका; केजमधील चौथी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 19:57 IST

केजमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा सिलसिला! आठवड्यात चौथी घटना, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

- मधुकर सिरसटकेज (बीड): बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी आता कहर केला आहे. जीवाचीवाडी येथे वडिलांना जेवण देऊन घरी परतणाऱ्या एका ११ वर्षीय निष्पाप मुलीचे दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने बळजबरीने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत खळबळजनक घटना बुधवारी (दि. ५) सकाळी १० वाजता घडली. सुदैवाने, या मुलीने दाखवलेल्या हिंमतीमुळे अपहरणकर्त्याला तिला रस्त्यातच सोडून पळून जावे लागले आणि मोठा अनर्थ टळला.

जीवाचीवाडी येथील ११ वर्षीय मुलगी शेतात वडिलांना जेवण देऊन पायी घराकडे परत येत होती. रस्त्यात तिला एकटी पाहून दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमाने तिला अडवले. "तुझ्या वडिलांकडे माझे पैसे आहेत, मला त्यांना भेटायचे आहे," असे खोटे सांगून मुलीला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला वडिलांच्या शेतात घेऊन जाण्याचे कबूल केले. याच संधीचा फायदा घेऊन त्या विकृत व्यक्तीने मुलीच्या नाकासमोर पावडरचा वास देऊन तिचे तोंड दाबले आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून तिचे अपहरण केले.

आरडाओरडा केल्याने बचावलीजीवाचीवाडी येथून आरोपी तिला केजच्या दिशेने घेऊन निघाला. सुमारे २५ किमी प्रवासानंतर, केजजवळ असलेल्या कानडी रोड लगतच्या वीटभट्टीजवळ आल्यावर या हिंमतवान मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलगी ओरडत असल्याचे पाहताच, घाबरलेल्या अपहरणकर्त्याने तिला रस्त्यातच सोडून दुचाकीवरून पोबारा केला. स्वसंरक्षणामुळे सुटलेली मुलगी पायी चालत केज बस स्थानकावर पोहोचली. तिथे तिची भेट एका नातेवाईक महिलेशी झाली. त्यांनी तातडीने मुलीच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैदपोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आरोपी लव्हूरी आणि कानडीमाळी मार्गे केजला आल्यामुळे येवता चौक, लव्हूरी आणि कानडीमाळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा दुचाकी नंबर व तो कैद झाला आहे. त्या आधारे आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल.

तालुक्यात आठवड्यातील चौथी घटना!केज तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील ही चौथी घटना असल्यामुळे पालक वर्गात मोठी चिंता आणि खळबळ पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 11-Year-Old Girl Escapes Kidnapper in Kej; Fourth Incident

Web Summary : In Kej, an 11-year-old girl bravely escaped a kidnapper who abducted her on a motorcycle. She screamed, causing him to abandon her near a brick kiln. Police are investigating using CCTV footage. This is the fourth such incident in the area recently.
टॅग्स :KidnappingअपहरणBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या