शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

coronavirus: शहरवासीयांना नाही जमले ते ग्रामस्थांनी मनावर घेतले; संचारबंदीचे ग्रामीण भागात गांभीर्याने पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:53 IST

संचरबंदी काळात ग्रामस्थ घराच्या बाहेर पडत नसल्याचे चित्र

ठळक मुद्देस्वयंशिस्तीने करतायत संचारबंदीचे पालनपोलीस नसतानाही घरा बाहेर पडणे टाळतात

माजलगाव : कोरोनाची दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असताना मात्र शहरातील नागरिकांना याचे गांभीर्य नसून संचारबंदी असतानादेखील ते रस्त्यावर दिसत असून याउलट ग्रामीण भागातील नागरिकांना याचे गांभीर्य दिसून येत असल्याने ते घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

भारतात अनेक राज्यांसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असताना व शासनाने संचारबंदी लावलेली असताना माजलगाव शहरातील नागरिक मात्र या संचार बंदीची दखल घेत नसून ते या काळात विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे चित्र मागील तीन-चार दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. नागरिकांच्या अशा वागण्यामुळे प्रशासन व पोलिसांवरील ताण वाढतांना दिसून येत आहे. संचारबंदी शिथिलच्या काळात फळ भाजीपालावाले एकदम जवळ जवळ बसत असून ते  गर्दीही जमवताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाला यांना उठवण्यात वेळ जात आहे. तर काही व्यापारी आपले दुकान अत्यावश्यक सेवेत येत नसतानाही दुकान उघडून बसलेले दिसून येत होते. या सर्व दुकाना बंद करण्यास सांगताना प्रशासनाची दमछाक होत आहे.        याउलट ग्रामीण भागातील परिस्थिती असून या ठिकाणचे नागरिक घरा बाहेर जाण्याचे टाळत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बोटावर मोजण्याइतके गाव वगळता अनेक गावात पोलिस बंदोबस्त नसतानादेखील नागरिक सतर्क राहत आहेत. व ते बाहेर पडण्याचे टाळत आहेत.

नागरिकांनी गर्दी टाळावी संचारबंदी शिथीलच्या काळात व्यापाऱ्यांनी गर्दी जमु नये यासाठी दुकानासमोर एक रेषा मारून त्या रेषेतुनच एक एक ग्राहकांना सामान दिले पाहिजे.नागरिकांनी कोणत्याही किंमतीत  गर्दी टाळली पाहिजे व आपणच आपल्याला  एकमेकांपासून वेगळे केले पाहिजे.-- डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार माजलगाव

नियम मोडल्यास गुन्हे दाखल करणारसंचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच थांबावे विनाकारण रस्त्यावर येऊ नये . नागरिकांना सांगून  सांगून देखील ते ऐकत नसतील तर त्यांना चोप दिल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय राहणार नाही व वेळ प्रसंगी गुन्हे देखील दाखल करण्यात येतील. तरी नागरिकांनी सबुरीने घेण्याची गरज आहे.- श्रीकांत डिसले ,उपविभागीय पोलीस अधिकारी , माजलगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड