शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus संशयितांची सीमारेषेवरच तपासणी; विदेशासह पुणे, मंबईहून येणाऱ्यांवर बीडच्या आरोग्य पथकाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 13:09 IST

आरोग्य पथकांसह पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.

ठळक मुद्देसर्वेक्षणासाठी आरबीएसकेचे पथक

बीड : १२ देशांसह कोरोना बाधीत नागपूर, पुणे, मुंबई शहरातून आलेल्या प्रवाशांची बीड जिल्ह्यात एन्ट्री करण्यापूर्वीच सिमारेषेवर तपासणी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात १४ चेक पोस्ट तयार केल्या आहेत. तसेच प्रत्येक तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष पथके नियूक्त केले आहेत. 

चीन, इटली, इरान, दक्षिण कोरीया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, संयुक्त अरब एमिरेटस (युएई), कतार, ओमान, कुवेत, यु.एस.ए (अमेरिका) या १२ देशांसह राज्यातील पुणे, मुंबई आणि नागरपूर येथून येणाऱ्या प्रवाशांची चेकपोस्टवर तपासणी केली जात आहे. त्यांची सर्व माहिती संकलीत करण्यासह त्यांना काही लक्षणे आहेत का, याची विचारणा केली जात आहे. लक्षणे असल्याचे समजताच त्यांना जवळच्या आरोग्य संस्थेत नेऊन क्वारंटाईन केले जाणार आहे. चेकपोस्टवर पोलिसांसह आरोग्याचे अधिकारी, कर्मचारी असणार आहेत.

तसेच प्रत्येक तालुक्यात एक आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. आलेल्या प्रत्येक रुग्णांची एका विहित नमुन्यात माहिती संकलीत करून उपचार केले जाणार आहेत. जिल्हा रुग्णालयासह प्रत्येक आरोग्य संस्थेत एक विशेष कक्ष तपासणीसाठी तयार करण्यात आला आहे. हे सर्व करताना आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनीही काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार हे यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. 

सर्वेक्षणासाठी आरबीएसकेचे पथकएखादी व्यक्ती नजर चुकीने सुटली किंवा आगोदरच शहरात आली असून आणि आता तिला लक्षणे जाणवत असतील तर याचे सर्वेक्षण करण्यासाठी आरबीएसकेच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे पथक नियूक्त केले आहेत. संपूर्ण आरोग्य यंत्रणा सात दिवस २४ तास कर्तव्यावर राहणार असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

येथे आहेत चेक पोस्टचौसाळा, पांढरवाडी फाटा, अंभोरा, महार टाकळी - शेवगाव, शहागड पुल, सोनपेठ फाटा, गंगाखेड रोड, गंगामसला, सादोळा, बर्दापुर फाटा, बोरगाव पिंपरी, मालेगाव अशी १४ चेक पोस्ट तयार करण्यात आली आहेत. येथे आरोग्य पथकांसह पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडHealthआरोग्य