शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

CoronaVirus : धक्कादायक ! कोरोनाग्रस्ताचे गावात आहे किराणा दुकान; पिंपळा गावासह परिसर अनिश्चित काळासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 12:56 PM

कोरोना विषाणू  संसर्ग  झालेला  रुग्ण  आढळल्याने पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित

ठळक मुद्देतहसिलदार, बिडिओ, पोलिस आरोग्य विभाग पिपळा गावात तळ ठोकून किराणा दुकान काही काळापासून बंद असल्याने दिलासा

- अविनाश कदम

आष्टी : तालुक्यातील पिंपळा येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे गावात किराणा दुकान आहे. यामुळे त्याचा रोज अनेकांशी संपर्क येत असल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. मात्र किराणा दुकान दोन महिन्यांपासून बंद असल्याने गावावरचे मोठे संकट काहीप्रमाणात टळल्याचे दिलासादायक चित्र आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फौजदारी दंड संहिता 1973 कलम 144 नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर सुंबेवाडी , धनगरवाडी , काकडवाडी , ढोबळ सांगवी व खरड गव्हाण हा परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित केला आहे .  

तालुक्यातील पिंपळा येथील दोन व्यक्ती अहमदनगर येथील एका कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने त्यांना अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवून होम कॉरंटाईन करण्यात आले. त्यातील एक किराणा दुकानदाराचा दि ७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फौजदारी दंड संहिता १९७३ कलम १४४ नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसरामध्ये सुंबेवाडी , धनगरवाडी , काकडवाडी , ठोंबळ सांगवी व खरडगव्हाण हा परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित केला आहे. यासोबतच पुढील चार किलोमीटर चा परिसर लोणी , नांदूर , सोलापूरवाडी , खुंटेफळ, कोयाळ हे गावे बफर झोन (buffer zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे . वरील सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित काळासाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येत असून संचारबंदी लागू केली आहे. पिंपळा परिसरातील सर्व रस्त्यांवर चर खोदून सीमा सील करण्यात आले आहेत. पिंपळा येथे तहसीलदार, बीडीओ, पोलीस, वैद्यकीय पथक तळ ठोकून आहेत.

 किराणा दुकान बंद असल्याने संकट टळलेकोरोना ग्रस्ताचे वय ६३ असून त्याचे दोन महिन्यांपासून किराणा दुकान बंद होते. यामुळेपुढचा अनर्थ टळला आहे. कोरोना बाधीताची पत्नी व मुलगा व अन्य दोन व्यक्तींना अगोदर आष्टीत ठेवण्यात आले होते. त्यांनंतर त्यांना बीड येथे नेऊन अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व मित्रपरिवाराचा शोध घेण्यात येत असून आतापर्यंत सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड