coronavirus : घरी परतण्यासाठी परळीच्या भाविकांची उत्तरप्रदेशातून आर्त हाक; वृंदावनमध्ये अडकलेत ९० भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:58 PM2020-03-25T17:58:12+5:302020-03-25T18:01:43+5:30

तुम्ही विदेशातून लोक आणली,आम्ही तर इथेच आहोत

coronavirus: Parali devotees call from Uttar Pradesh to return home; 90 devotees get stuck in Vrindavan | coronavirus : घरी परतण्यासाठी परळीच्या भाविकांची उत्तरप्रदेशातून आर्त हाक; वृंदावनमध्ये अडकलेत ९० भाविक

coronavirus : घरी परतण्यासाठी परळीच्या भाविकांची उत्तरप्रदेशातून आर्त हाक; वृंदावनमध्ये अडकलेत ९० भाविक

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे बुकिंग झाले रद्दस्थानिक प्रशासन करत नाही सहकार्य

- संजय खाकरे

परळी : देशात लॉकडाऊन  केल्यामुळे तीर्थयात्रा व भागवत कथेला गेलेले  शहरातील श्री  संत सावता माळीनगर ,कृष्णा नगर ,किर्ती नगर व अन्य भागातील तसेच पानगाव ,परभणी येथील  90 महिला -पुरुष भाविक मथुरा आणि वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे    अडकले आहेत .                   

 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 22 मार्च ला जनता कर्फ्यू व त्यानंतर  लॉक डाऊन केल्याने 22 मार्च पासून रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत यामुळे  त्या 90 जणांना परळी कडेे येता येत नाही, त्यामुळे 25 मार्च पासून त्यांचे जेवणाचे हाल सुरू झाले आहेत "कसेही करून आम्हाला परळी कडे येऊ द्या अशी विनवणी वृंदावन येथे आश्रमात मुक्कामाला थांबलेले परळी व अन्य ठिकाण चे लोक करून लागले आहेत                            

श्याम महाराज उखळीकर यांच्या नेतृत्वाखाली परळी शहरातील श्री संत सावता माळी नगर ,कृष्णा नगर सिद्धेश्वरनगर ,किर्ती नगर, देशमुख गल्ली येथील 80 जण तसेच पानगाव ,परभणी व पंढरपूर येथील भाविक 16 मार्च रोजी परभणी येथुन  सचखंड एक्सप्रेस रेल्वेने निघून दोन दिवसांनी मथुरा येथे पोहचलेे तेथील दर्शन व वृंदावन येथे  आयोजित केलेली भागवत कथा श्रवण करून 22 मार्च रोजी तेथून निघण्यासाठी  रेल्वे गाडी सिट चे आरक्षण केले होते .परंतु 22 मार्च जनता कर्फ्यू असल्याने रेल्वे गाड्या रद्द झाल्या त्यानंतर लॉक डाऊन  झाले  या कारणामुळे वृन्दावन  मध्ये अडकलेल्या नव्वद जणांना परळी येथे येण्याची कुठलीही सुविधा नाही पर्यायाने त्यांना आश्रम मध्ये मुक्काम करावा लागत आहे         

 

25 मार्च रोजी वृंदावन येथे असलेले परळीतील छायाचित्रकार हनुमान आगरकर ,निवृत्त  लिपिक डी एन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की परळी व परिसरातील आम्ही 90 जण वृन्दावन  येथील आश्रमात आहोत आम्हाला परळी कडे यायचे आहे कसेही करून तिकडे  आणा" अशी विनवणी त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी ही केली आहे              

 परळी च्या प्रभाग क्रमांक पाच मधील बहुतांशी नागरिक वृंदावन येथे तीर्थयात्रेला गेले होते अशी माहिती येथील नगरसेवक व शिक्षण समितीचे माजी सभापती गोपाळ आंधळे   यांनी ही दिली आहे  त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा तेथील लोकांशी मोबाइलद्वारे संपर्क साधून दिला आहे, मंत्री मुंडेयांनी संवाद साधून दिलासा दिला आहे, परंतु प्राप्त माहितीनुसार परळीकडे येण्यास कोरोना च्या आणिबाणीच्या परिस्थिती मुळे अडचणी येत असल्याचे समजते

Web Title: coronavirus: Parali devotees call from Uttar Pradesh to return home; 90 devotees get stuck in Vrindavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.