शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus: लॉकडाउनमुळे रोजगार हिरावला; अन्न-निवाऱ्यासाठी मजूर कुंटूंबाचा इंदापूर ते मानवत पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 16:19 IST

जागो जागी मदत झाली, कधी पाण्यावर काढला दिवस 

ठळक मुद्देधारूर येथे अन्नाची झाली सोयआणखी तीन ते चार दिवस लागणार घरी पोहचण्यास

- अनिल महाजन

धारूर :  इंदापूर येथे इमातीच्या बांधकामावर मजूरी करण्यासाठी गेलेल मानवत येथील अशोक अंबादास रेंगडे  हे दोन मुले, पत्नीसह पायी घराकडे निघाले आहेत. कोरोना मुळे काम बंद झाल्याने मुळ ठेकेदार निघून गेला, यामुळे राहण्याखाण्याची चिंता निर्माण झाल्याने पंधरा दिवसांपासून हा खडतर प्रवास कुटुंब आणि साडूसह करत आहेत. या दरम्यानचे त्यांचे अनूभव ऐकताना अंगावर शहारे येतात. कधी उपाशीपोटी पाण्याचा घोट पिऊन तर कधी कोणी दिलीच मदत तर ती घेऊन मोठ्या आशेने हे कुटुंब घराकडे निघाले आहे.

कोरोना चे प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व अघाड्यावर उपाययोजना कठोरपणे करत आहे. लाॕकडाऊनमुळे हातावर पोट असणारा मजूर वर्ग माञ त्रस्त होऊन गेला आहे. उदरनिर्वाहसाठी स्थंलातरीत झालेले मजूर तर अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. अशीच परिस्थिती मानवत येथील अशोक अंबादास रेंगडे यांच्यावर आली आहे.  ते पत्नी व दोन लहान मुला सह इंदापूर जि पुणे येथे बांधकामावर चांगली मजूरी मिळते म्हणूण एक वर्षापूर्वी गेले होते. माञ कोरोनामुळे  काम बंद झाले अन ठेकेदार निघून गेला. यामुळे कुंटूंबाचे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला. याच काळात कामाचे शोधात त्यांचा साडू तिथे आला. 

सर्व कुंटूंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी मानवतला जायचे ठरवले. मात्र हातात पैसे नाहीत अन प्रवासाला वाहन नाही यामुळे हे पायीच घराकडे निघाले. सहपायपीट करत दोनशे पेक्षा जास्त किंमीचा प्रवास करत डोक्यावर संसार घेऊन पंधराव्या सोळव्या दिवशी धारूरला पोहचले. मानवतला पोहचायला आणखी तिन ते चार दिवस लागणार आहेत. रस्त्यात जिथे निवारा मिळेल तिथे मुक्काम केला रस्त्यात ब-याच ठिकाणी लोकांनी खायला दिले माञ काही राञी पाणी पिऊन झोपावे लागले. कोरोनामुळे फक्त आपल्या मुळ गावात पोहचायचे एवढेच ध्येय समोर हे कुंटूब सर्व अडचणीवर मात करून प्रवास करत आहे. दरम्यान, हे कुंटूंब धारूर येथे आले असता राधेश्याम रहेवाल यांनी त्यांना जेवण देऊन पुढे पाठवले. येथे त्यांच्या प्रवासाची कहाणी व अनूभव ऐकतान माञ आंगावर शहारे उभे राहत होते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड