coronavirus : कोरोनाबाधिताचा बेजबाबदारपणा; रुग्णालयात वावर, सार्वजनिक टाकीवर झाला ‘फ्रेश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 07:44 PM2020-05-20T19:44:07+5:302020-05-20T19:51:17+5:30

सुशिक्षित असलेल्या रुग्णाच्या बेजबाबदारपणामुळे संताप व्यक्त होत आहे. हे कुटूंब बीडकरासांठी चांगलेच त्रासदायक ठरले आहे. 

coronavirus: irresponsibility of coronavirus patient ; Wandering in hospital, 'fresh' on public tank | coronavirus : कोरोनाबाधिताचा बेजबाबदारपणा; रुग्णालयात वावर, सार्वजनिक टाकीवर झाला ‘फ्रेश’

coronavirus : कोरोनाबाधिताचा बेजबाबदारपणा; रुग्णालयात वावर, सार्वजनिक टाकीवर झाला ‘फ्रेश’

googlenewsNext
ठळक मुद्देसुशिक्षित रुग्णाचा बेजबाबदारपणा अहमदनगरचे ‘ते’ कुटुंब बीडकरांसाठी ठरले चिंतेचा विषय

बीड : अहमदनगर जिल्ह्यातील एक कुटूंब बीडमध्ये कोरोना पॉजिटिव्ह आढळले होते. त्यांनी पुण्याला उपचार घेण्याची इच्छा दर्शविली. पुण्याला पाठवित असतानाच त्यातील एक  पुरूष रुग्णवाहिकेत बसून न राहता रुग्णालय परिसरात वावरल्याचे समोर आले आहे. तसेच एका सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ जावून तो फे्रशही झाला. हा प्रकार एका व्हिडीओमधून समोर आला आहे. सुशिक्षित असलेल्या रुग्णाच्या बेजबाबदारपणामुळे संताप व्यक्त होत आहे. हे कुटूंब बीडकरासांठी चांगलेच त्रासदायक ठरले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवाशी असतानाही सात लोकांचे कुटूंब आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे सासरवाडीला आले. येथे चार दिवस राहिल्यानंतर त्यांना लक्षणे जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात आणले. येथे सर्वांचेच रिपोर्ट पॉजिटिव्ह आढळले. त्यानंतर सांगवी पाटण पसिरातील ७ किमी अंतरातील गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. प्रशासन कामाला लागले. रोज घरोघरी जावून सर्वेक्षण करण्याबरोबरच आजारी लोकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरूवात झाली. तसेच बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही झपाट्याने वाढला आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

इकडे उपचारासाठी रुग्णालयात आणल्यावर याच कुटूंबातील ६५ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर याच कुटूंबातील एका पुरूषाने आम्हाला सुविधा नाहीत, उपचार व्यवस्थित नाहीत, असे सांगत सर्वाना संपर्क केला. आपल्याला पुण्याला उपचारासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. रेफरसंदर्भात कारवाईसाठी अख्ख प्रशासन कामाला लागले. सायंकाळच्या सुमारास कशीतरी परवागनी देण्यात आली. १०८ रुग्णवाहिका एक डॉक्टर आणि एक चालक अशी यंत्रणा सज्ज झाली. त्यांना खाली आणल्यावर कुटुंबातील ह्या सहाही व्यक्ती रुग्णवाहिकेत न बसता बाहेर बसल्या. 
यातील एक पुरूष पाण्याची बाटली हातात घेऊन सार्वजनिक टाकीवर गेला. येथे पाणी घेऊन तो फे्रश झाला. यावेळी बाजूला तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होती. त्याच टाकीवरून इतर रुग्ण व नातेवाईकांनी पाणी नेल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. हा रुग्ण सुशिक्षित असतानाही त्याने केलेल्या बेजबाबदारपणामुळे संताप व्यक्त होत आहे. त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

प्रकरणाची चौकशी; पोलीस ठाण्यात तक्रार
पुण्याला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चालक हा पीपीई कीट बदलून येत होता. त्यामुळे त्याला १० मिनिटांचा वेळ लागला. तेवढ्यात हा रुग्ण परिसरात मुक्तपणे वावरल्याचे दिसते. या प्रकरणात नेमके काय झाले? याची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत संबंधित रुग्णाविरोधात पोलीस ठाण्या तक्रारही दिली आहे. 

प्रशासनालाही हलगर्जी भोवणार
आरोग्य विभाग आणि सुरक्षा व्यवस्थेचाही या प्रकरणी हलगर्जीपणा झाल्याचे दिसते. रुग्णवाहिका पूर्ण निघण्याची तयारी झाल्यावरच त्यांना वॉर्डमधून खाली आणणे अपेक्षित होते आणि आणल्यानंतरही ते रुग्णवाहिकेतून खाली उतरणार नाहीत, इकडे तिकडे जाणार नाहीत, याबाबत सुरक्षा रकक्षकांनी लक्ष देणे अपेक्षित होते. या प्रकरणात सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सकारात्मक विचार करून उपाययोजना करण्याची मागणी सामान्यांमधून होत आहे. 

पुण्याला पाठविण्यापूर्वी रुग्णवाहिकेत न बसता रुग्ण इतरत्र वावरल्याचा व्हिडीओ पाहिला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच रुग्ण हा सुशिक्षित आहे. सर्व परिस्थिती ज्ञात असतानाही त्याने केलेल्या बेजबाबदारपणामुळे त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कारवाई केली जाईल. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

जिल्हा रुग्णालयातील तक्रार आली आहे. याबाबत चौकशी केली जाईल. त्यानंतर कारवाई करू.
- गजानन जाधव, सपोनि, शहर पोलीस ठाणे, बीड

Web Title: coronavirus: irresponsibility of coronavirus patient ; Wandering in hospital, 'fresh' on public tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.