शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : परराज्य आणि जिल्ह्यातून उसतोड मजुरांचे लोंढे येणे सुरूच , माजलगावात 40 मजुर निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:20 IST

एका  ट्रॅक्टर मध्ये 15-20 लोकांसह बालकांचाही समावेश

ठळक मुद्देकर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून येत आहेत मजूर

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव: पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक मधील साखर कारखाने 4-5 दिवसापुर्वी बंद करण्यात आल्याने ऊसतोड काम मजुरांचे लोंढेच्या लोंढे येणे सुरूच असुन एकाच वाहणात 15-20 मजुर येत असुन यात बालकांचाही समावेश असुन सोमवारी साखर कारखाना हंगाम आटोपून परत येथे आलेल्या 40 ऊसतोड कामगाराना शहराबाहेरील एका शाळेत निगराणी खाली ठेवण्यात आले .

पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकामधील साखर कारखान्याला माजलगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर लोक ऊस तोडणीसाठी जात असतात हे कारखाने 4-5  दिवसांपूर्वीच बंद करण्यात आल्याने याठिकाणी ऊसतोडणीसाठी गेलेले मजुर रात्री उशिरा आपल्या गावात येत आहेत त्यामुळे त्यांची तपासणी देखील न करताच ते घरी येत असल्यामुळे गावागावात या मजुरांमुळे कोरोनाची लागण लागण्याच्या भितीने अनेक गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या मजुरांंचे लोंढे लोंढे माजलगाव शहर व ग्रामीण भागात येत असून एकाच वाहनात 15 ते 20 मजूर येत असून यात बालकांचा देखील समावेश आहे.         

 माजलगाव शहरातील व परिसरातील काही कुटुंबातील लहान-मोठे 40 जण उसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेले होते, सोमवारी पहाटे तीन वाजता एका ट्रॅक्टर मध्ये हे सर्व माजलगाव शहरात दाखल झाले असता त्यांना परभणी फाटीवर अडवून तपासणी केली असता त्यांच्या हातावर शिक्के दिसून आले त्यामुळे या सर्व लोकांना तहसीलदार प्रतिभा गोरे यांचे आदेशानुसार शहराबाहेरील एका शाळेत निगराणी खाली ठेवण्यात आले व या ठिकाणी आल्यानंतर खाण्यापिण्याची काहीच व्यवस्था केली नसल्याचे हे लोक सांगत आहेत. तर निगरानीत असलेल्या सर्वांची  खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल परदेशी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडSugar factoryसाखर कारखाने