शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
2
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
3
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
4
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
5
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
6
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
8
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
9
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
10
ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?
11
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
12
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
13
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
14
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
16
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
17
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
18
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
19
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
20
Mumbai Local: मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक

मोठी कारवाई! बीडच्या सायबर ठाण्यातील वादग्रस्त रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस

By सोमनाथ खताळ | Updated: April 18, 2025 10:56 IST

महानिरीक्षकांची कारवाई : आज सकाळी पुण्यातून घेतले बीड पोलिसांनी ताब्यात

बीड : येथील सायबर पोलिस ठाण्यातील वादग्रस्त निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. तो गुरूवारी रात्री उशिरा पोलिसांना शरण येणार होता, परंतू तसे न करता तो एका लॉजवर जावून झोपला. आज सकाळी बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. परंतू त्या आधीच गुरूवारी रात्री छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी कासले याला पोलिस खात्यातून डिसमीसचे आदेश काढले. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी ही माहिती दिली.

रणजित कासले हा सायबर पोलिस ठाण्यात असताना विनापरवानगी आरोपीला घेऊन गुजरातमध्ये गेला होता. तेथे त्याने पैसे घेतल्याचा आरोप झाल्यने २६ मार्च रोजी त्याला निलंबित केले होते. त्यानंतर कसले याने अनेक व्हिडीओ व्हायरल केले होते. यातील एकामध्ये त्याने एका समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी बीडमधील वकिलाच्या फिर्यादीवरून १४ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते. परंतू तो सापडत नव्हता, उलट त्याने महाराष्ट्र पोलिसांना हिंमत असेल तर पकडून दाखवा, असे आव्हान दिले होते. परंतू गुरूवारी रात्री तो पुण्यात आला. विमानतळावरच त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने पुन्हा एकदा सरकार आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यावर आरोप केले. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावरही सडकून टिका केली.

'गब्बर इज बॅक' असे स्टेटसगुरूवारी सकाळी कासले याने सोशल मिडीयावरून काही रिल्स व्हायरल केल्या. यात त्याने 'गब्बर इज बॅक' असे लिहून चारचाकी वाहनाची स्पीड १५७ पर्यंत असल्याचे दाखविले. याच वाहनात त्याने आपली पोलिसची टोपीही समोर ठेवल्याचे दिसत आहे. निलंबणानंतरही समोर टोपी ठेवून तो इतरांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता.

बीड पोलिसांना घुमवलेॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कासलेच्या मागावर धावले. परंतू त्यांनाही तो सापडला नाही. वेगवेगळे ठिकाण सांगून त्याने बीड पोलिसांना दोन दिवस चांगलेच घुमवले. गुरूवारीही तो शरण येणार असे, सांगितले होते, परंतू त्याने पुन्हा एकदा चकवा दिला. परंतू बीड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका लॉजमधून कासले याला ताब्यात घेतले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिस