शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

बीडमध्ये कंत्राटी कर्मचा-यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:04 IST

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने जारी केलेल्या कंत्राटी पद्दतीने निर्माण केलेल्या पदांवरील नेमणुकीच्या अटी व शर्तींबाबतचा तसेच या पदावर नियुक्त कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करण्याबाबत शासनाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी जारी केलेल्या निर्णयाच्या विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील शासकीय कंत्राटी कर्मचारी एकवटले. धरणे आंदोलन करत हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

ठळक मुद्देएकमुखी मागणी : ९ फेब्रुवारीचा जीआर रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने जारी केलेल्या कंत्राटी पद्दतीने निर्माण केलेल्या पदांवरील नेमणुकीच्या अटी व शर्तींबाबतचा तसेच या पदावर नियुक्त कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करण्याबाबत शासनाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी जारी केलेल्या निर्णयाच्या विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील शासकीय कंत्राटी कर्मचारी एकवटले. धरणे आंदोलन करत हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

शासनाने काढलेले परिपत्रक कंत्राटी कर्मचा-यांवर अन्याय करणारे असून या कर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मागील १५ ते २० वर्षांपासून राज्यातील विविध विभागात कंत्राटी पध्दतीने काम करण्यासाठी रितसर निवड झालेली आहे. तेव्हापासून शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी ते काम करत आहेत. अद्यापपर्यंत त्यांना कायम केलेले नाही.

शासनाने जारी केलेल्या परित्रकानुसार कंत्राटी कर्मचा-यांची नेमणूक प्रथमत: ११ महिन्यासाठी करण्याचे व अशा प्रकारे जास्तीत जास्त ३ वेळा नियुक्ती काढण्याचे आदेश आहेत. त्यामुळे पुन्हा निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असल्याने पुर्ननिवड प्रक्रियेमुळे वय जास्त झाल्यामुळे अपात्र ठरण्याची भिती या कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे कंत्राटी कर्मचारी नियुक्तीच्या संदर्भात ९ फेब्रुवारी रोजी जारी केलेला अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. घोषणांनी परिसर दणाणून गेला.न्यायालयाचा अवमान : भविष्याशी खेळकंत्राटी कर्मचा-यांची अनेक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. काही निकाल कंत्राटी कर्मचाºयांच्या बाजूने लागलेले आहेत. त्यावर राज्य शासनाकडून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. असे असताना शासनाने घाईघाईने परिपत्रक काढून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असून लाखो कंत्राटी कर्मचाºयांच्या भविष्याशी खेळ मांडल्याचे कर्मचाºयांनी म्हटले आहे. विविध विभागातील कंत्राटी

कर्मचारी प्रथमच आले एकत्रसंपूर्ण राज्यात प्रत्येक दहा घरांमागे एक कंत्राटी कर्मचाºयाचे कुटुंब आहे. शासनाच्या जाचक परिपत्रकामुळे राज्यातील २५ टक्के कुटुंबांवर परिणाम झाला आहे. जीआर रद्द न केल्यास मार्चमध्ये बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा कर्मचाºयांनी दिला.

या विभागाच्या कर्मचा-यांचा होता सहभागसर्व शिक्षा अभियान कर्मचारी समन्वय समिती, महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजना  राज्य जि. प. शासकीय कर्मचारी ,  राज्य एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, दिनदयाळ अंत्योदय योजना, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, एड्स नियंत्रण, जिल्हा क्षय रोग विभागातील कंत्राटी कर्मचारी कृती समितीचा या आंदोलनात सहभाग होता.