शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सोनीमोहा येथे लोकसहभागातून बांधलेल्या बंधा-यामुळे पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 19:25 IST

तालुक्यातील सोनीमोहा येथील नदीवर शेतकर्‍यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सोनी नदीवर पॉलिथिन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्‍यामुळे नदी पात्रात  मोठा  पाणीसाठा झाला आहे. तसेच लगतच्या विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त  करीत  आहेत. 

ठळक मुद्देसोनीमोहा येथील नदीवर शेतकर्‍यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सोनी नदीवर पॉलिथिन बंधारा बांधण्यात आला आहे. विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त  करीत  आहेत. 

धारुर (बीड) : तालुक्यातील सोनीमोहा येथील नदीवर शेतकर्‍यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सोनी नदीवर पॉलिथिन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्‍यामुळे नदी पात्रात  मोठा  पाणीसाठा झाला आहे. तसेच लगतच्या विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त  करीत  आहेत. 

तालुक्यातील सोनीमोहा, जहांगीरमोहा व आंबेवडगाव शिवारातून सोनी नदी वाहते. नदीला पावसाळ्यानंतर दरवर्षी दोन ते तिन महिने पाणी असते. वाहते पाणी सिमेंट बंधारे बांधून अडविल्यास रबी पिकास त्याचा फायदा होतो. मागील दोन वर्षापूर्वी मंत्री गिरीश बापट यांनी दुष्काळी दौरा या परिसरात केला होता. या वेळी सोनीमोहाकरांनी सोनी नदीवर सिमेंट बंधारे बांधावेत अशी मागणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीवरुन तीन ठिकाणी सिमेंट बंधारे मंजूर झाले होते. यासाठी ५० लक्ष रुपये निधीही मंजूर झाला होता. मात्र, अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने मागील वर्षात सिमेंट बंधार्‍याच्या कामाच्या निविदा न काढल्याने कामे झालीच नाहीत.

या वर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. पावसानंतर सोनी नदीला स्वच्छ पाणी खळखळू लागले आहे. सिमेंट बंधारे वेळीच बांधले असते तर याचा शेतीसाठी फायदा झाला असता. वाहून जाणारे पाणी वेळीच अडवावे म्हणून संदीपान तोंडे यांनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना पॉलिथिन बंधार्‍याविषयी माहिती दिली. येथील शेतकरी कोंडीबा तोंडे, भगवान तोंडे, इंदर तोंडे यांनी एकत्र येऊन नदीवर लोकसहभागातून गावालगत पूर्वेस पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी नदीवर जेसीबीच्या सहाय्याने माती भराव टाकून त्यावर १०० फूट लांब व १२ फूट रुंद पॉलिथिन वापरुन बंधारा उभारला आहे. नदीपात्रात मोठा पाणीसाठा झाला असून, परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. तसेच गावातील आड व बोअरला फायदा होणार आहे. बंधारा उभारणीसाठी परमेश्वर राऊत, शेख अब्बास, गणपती तोंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

रबीच्या पिकांना होणार फायदासोनी नदीवर शेतकर्‍यांनी पॉलिथिन बंधारा उभारला आहे. वाहून जाणारे पाणी अडविण्यात आल्याने मोठा साठा झाला आहे. यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढली आहे. रबीच्या पिकांना याचा फायदा होणार आहे.- भगवान रामभाऊ तोंडे, शेतकरी, सोनीमोहा

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड