शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

संतोष देशमुख प्रकरण: तिरंगा हॉटेलवरचा ‘घास’; वाल्मीकच्या गळ्याला ‘फास’, तिथेच शिजला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 08:25 IST

‘तुम्ही सुदर्शन व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर तुम्हाला ते सोडणार नाहीत’, असा सल्ला एकाने संतोष देशमुखांना दिला होता. तर दुसरीकडे, विष्णू चाटे म्हणाला की, ‘वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.’ 

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह अन्य एकजण केज तालुक्यातील नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्याच ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला. 

चाटे आणि घुले यांच्यात झालेल्या संवादाचा प्रत्येक ‘शब्द’ आता सीआयडीने घेतलेल्या एका व्यक्तीच्या जबाबात आला आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड हा हत्येत आरोपी तर झालाच पण या कटाचा मास्टरमाइंड असल्याचेही उघड झाले. या प्रकरणात ५ गोपनीय साक्षीदारांचा समावेश आहे.    

६ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोग येथील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात सुदर्शन घुले दिसत होता. ८ डिसेंबर २०२४ रोजी घुले आणि अन्य एकजण टाकळी येथे भेटले. यावेळी घुले याने विष्णू चाटे याचा फोन आला असून तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावल्याचे सांगितले. चाटे हा अगोदरच तेथे होता. चाटे याने सुदर्शन घुले याला चांगलेच झापले होते. 

देशमुखांनाही सल्ला

मारहाणीचा व्हिडीओ पाहून एका व्यक्तीने सरपंच देशमुख यांना, ‘तुम्ही सुदर्शन व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाही तर तुम्हाला ते सोडणार नाहीत’ असा सल्ला दिला. यापूर्वी मलाही कराडने धमकी दिली होती. मी विरोध केल्याने खोट्या गुन्ह्यात अडकवले, असे जबाबात त्याने सांगितले आहे.   

असा झाला होता संवाद  

‘आम्ही कमवायचे, तुम्ही वाटोळे करायचे, स्वत:ची व आमची पण इज्जत  घालवलीस. तुला प्लँट बंद करायला पाठवले होते, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आलास’ असे चाटे म्हणाला. त्यावर घुले म्हणाला की, ‘आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो. तेथे संतोष देशमुख आला व त्याने कंपनी बंद करू दिली नाही.’ यावर चाटे म्हणाला, ‘वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, कामही बंद केले नाही. खंडणीही दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा.’ 

‘मारेकऱ्यांना कोणी पाठवले, खंडणी कोणासाठी होती?’

माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतूनच झाली आहे. परंतु, या लोकांना खंडणी मागायला कोणी पाठवले? त्यांना कोणाचा वरदहस्त होता? असा सवाल मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने केला. तसेच ही खंडणी कोणासाठी जात होती? याचीही चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणीही वैभवीने केली आहे. 

हातपाय तोडा, पण... 

माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली. ते हातपाय तोडा, पण गाव, मुलांसाठी जगू द्या, अशी विनवणी करत होते. परंतु, त्यांनी कसलीही दयामाया दाखवली नाही, ते निर्दयीपणे मारहाण करीतच राहिले,  असेही वैभवी म्हणाली. 

 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराड