शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा; जगमित्र शुगर मिल्स प्रकरणात जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 19:09 IST

२०१८ साली मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

अंबाजोगाई - तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या प्रकरणात २०१८ साली दाखल गुन्ह्यात पालकमंत्री  धनंजय मुंडे यांना आज सोमवारी (दि.०४) अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्या.शिवदत्त पाटील यांनी जामीन मंजूर केला. 

२०१८ साली मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी वारंट निघाल्याने धनंजय मुंडे यांनी न्यायालासमोर स्वतः हजर होत जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी मुंडे यांच्यावतीने ॲड. अशोक कवडे यांनी कामकाज पाहिले.

काय आहे प्रकरण-:अंबाजोगाईतील तळणी गावात राहणाऱ्या मुंजा गिते यांची जवळपास तीन हेक्टर जमीन जगमित्र साखर कारखान्यासाठी ५० लाखांत खरेदी करण्यात आली होती. व्यवहारात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याला कारखान्याने अगोदर एक लाख आणि काही दिवसांनी ७ लाख ८१ हजार २५० रुपयांचा चेक दिला गेला. शिवाय या साखर कारखान्यात गिते यांच्या मुलासहीत आणखी चौघांना नोकरी देण्याचीही हमी देण्यात आली होती. गिते यांचा मुलगा, नातू आणि भावाच्या दोन मुलांना प्रतिमाह तीन हजार रुपयांप्रमाणे सहा महिने काम देऊन पगारही देऊ करण्यात आला. मुंडे यांच्यासाठी मुखत्यारपत्र वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्या नावावर करण्यात आलं. त्यानंतर मात्र कारखान्याच्या नावे परळी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावानं असलेला ४० लाख रुपयांचा चेक गिते यांना देण्यात आला आला होता.तो चेक न वाटल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयBeedबीड