शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

मराठा आरक्षण: आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदची हाक

By सोमनाथ खताळ | Updated: September 1, 2023 21:42 IST

अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे.

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील बसही जाळण्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालन्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले, तर इकडे बीडमध्येही याचे पडसाद उमटले. मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या मान्य करण्याची मागणी केली. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. शनिवारी बीड बंदची हाक देण्यात आली आहे. 

अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. याला राज्यभरातून पाठिंबा दिला जात आहे. या उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी दुपारीही मोठ्या फौजफाट्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली; परंतु नकार मिळाला. याचवेळी आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, तसेच आंदोलकांनीही दगडफेक केली. यात पोलिसांसह आंदोलक, सामान्य नागरिक जखमी झाले. सायंकाळच्या सुमारास सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या बसही जाळण्यात आला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद बीड जिल्ह्यातही उमटले आहेत. शुक्रवारी दिवसभर गेवराई शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आज बीड बंदची हाकही देण्यात आली आहे. यात सर्व संघटना सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

बीड पोलिसांचीही धाव

आंदोलन चिघळल्याचे समजताच बीड पोलिसांनीही अंतरवाली सराटी गावात धाव घेतली. जालना, छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह ७० ते ८० पोलिसांचा फौजफाटा रात्री उशिरापर्यंत जालना जिल्ह्यात बंदोबस्तासाठी तैनात होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर प्रत्येक परिस्थितीचा आढावा घेत होते. दरम्यान, पांडकर यांच्या हाताला दगड लागला असून तीन टाके पडल्याची माहिती आहे. इतरही पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत.

टॅग्स :BeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाJalna Policeजालना पोलीस