शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'तुमच्याकडून मिळालेला लोकसेवेचा वसा निभावण्यासाठी वचनबद्ध...'; गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 11:47 IST

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनातील संघर्ष व विविध निवडणुकीतील आठवणींचा आज कल्लोळ निर्माण झाला आहे.

परळी (बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नववा स्मृतिदिनानिमित्त तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. सकाळपासून गोपीनाथ गडावर गर्दी झाली आहे. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केल्यानंतर आमदार धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनातील संघर्ष व विविध निवडणुकीतील आठवणींचा आज कल्लोळ निर्माण झाला आहे. बॅनरवरील त्यांचे फोटो पाहून वेगवेगळ्या सभा व त्यांचे भाषण आठवत होते. कोणत्या सभागृहात कोणते भाषण केले व कुठल्या कार्यक्रमात तलवार घेतली होती हे फोटो पाहून तीव्र आठवणी दाटून आल्या. गोपीनाथराव मुंडे यांचा खूप सहवास लाभला आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या आठवणी आपल्यात राहतील असे धनंजय मुंडे म्हणाले. यासोबतच मुंडे यांनी सोशल मीडियातून 'अप्पा... लोकसेवेचे व्रत आणि वसा तुमच्याकडूनच मिळाला आणि तो निभावण्यासाठी सदैव वचनबद्ध राहीन.' अशा भावना व्यक्त केल्या आहेत. 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाची  तयारी करण्यात आली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी  राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. गोपीनाथ गडावर दुपारी १ ते ३ वा. दरम्यान ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे तद्नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBeedबीड