शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:45 IST

''या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या...!''

बीड: भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्या दरवर्षी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावरील यंदा प्रथम भाऊ धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहे. याबाबत स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडिया साईट 'एक्स'वर याची माहिती देत, 'चलो भगवान भक्तीगड!' चा नारा दिला आहे. 

राज्यात दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. यातील गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडावरील मेळाव्याकडे राज्यभराचे लक्ष वेधले जाई. त्यांच्यानंतर आ. पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा सुरू केला. यात पंकजा यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही बहिणी आणि राज्यातील अनेक ओबीसी नेते उपस्थिती लावत. मात्र, राज्यातील बदलत्या समिकरणात भाजपा आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी सत्तेत सोबत आली आहे. लोकसभेसाठी महायुतीकडून पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकीट मिळाल्यानंतर भाऊ धनंजय मुंडे यांनी सारी सूत्र हाती घेत निकराने प्रचार केला. लोकसभेत पकंजा यांचा पराभव झाला मात्र यावेळी मुंडे कुटुंब अनेक वर्षांनी एकत्र आल्याचे चित्र दिसले. यामुळेच कुटुंबातील हेच ऐक्य दसरा मेळाव्यात देखील दिसेल का याची उत्सुकता होती. 

दरम्यान, राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा मेळावा १२ ऑक्टोबर रोजी होत आहे. यासाठी राज्याचे नेते कोण येणार? हे अद्याप सांगितलेले नाही; परंतु जिल्ह्यात अजित पवार गटाचे धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे या बहीण-भावाची जास्त चर्चा असते. आता हे दोघेही महायुतीत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे हे मेळाव्याला जाणार का? असा प्रश्न आहे. याचे उत्तर आता स्वतः धनंजय मुंडे यांनी दिले असून, चलो भगवान भक्तीगड...! असा नारा त्यांनी दिला आहे. सोशल मिडियातील संदेशात मुंडे म्हणाले,''आपला दसरा, आपली परंपरा...! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या...!''

राज्यातील बदलते सामाजिक, राजकीय वातावरणश्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही १२ ऑक्टोबरलाच दसरा मेळावा होत आहे. या ठिकाणी लाखो समाजबांधव येतील, असा दावा केला आहे. जरांगे यांनी सातत्याने ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. राज्यभरात यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र उभे राहून याचा फटका लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांना बसला. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच जरांगे यांचा दसरा मेळावा होत आहे. हा मेळावा केवळ मराठ्यांचा नसून सर्वांचा आहे असे जरांगे यांनी जाहीर केले असले तरी या मेळाव्याच्या माध्यमातून ते कोणती भूमिका मांडतात याकडेही लक्ष आहे. यासोबतच मुंडे भाऊ- बहीण राज्यातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात कोणती भूमिका मेळाव्यातून मांडतात याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड