शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बिबट्याला पकडण्यासाठी आष्टी तालुक्यात वनविभाचे कोम्बिंग ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 3:28 PM

वन विभागाने रविवारी रात्रीपासून संपूर्ण तालुका काढला पिंजून  

ठळक मुद्देजुन्नरचे विशेष पथक तालुक्यात होणार दाखल 

- अविनाश कदम 

आष्टी : तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून जोगेश्वरी पारगांव येथे दिवसात एकाच दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात १ महिला जखमी झाली तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन सुरु आहे. या दरम्यान काही ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काही वेळात जुन्नरचे पथक तालुक्यात दाखल होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शाम सिरसाठ यांनी दिली आहे.

आष्टी तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतक-यांनी शेतात एकटे जाऊ नये समुहाने शेतात जावे. हातात काठी असावी रात्री घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभाग व पोलिस प्रशासनाने केले आहे. जोगेश्वरी पारगांव येथे घटनास्थळी रात्रभर बिबट्याला शोधण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी काही ठिकाणी बिबट्याच्या ठसे आढळून आले आहेत. यावरून पथक बिबट्याचा माग काढत आहे.

तालुक्यात जुन्नरचे पथक येणार दरम्यान, सोमवारी सकाळपासून वन विभागाची पथके आष्टी तालुक्यात सर्वत्र सर्च मोहीम राबवत आहेत. सुर्डी, किन्ही, पांगुळगव्हाण, मंगरूळ आणि पारगाव जोगेश्वरीमध्ये सध्या वन कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कामाला लागले आहेत. या परिसरामध्ये ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. आज रात्रीपर्यंत जुन्नरचे विशेष श्वान पथक आष्टीत दाखल होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शाम सिरसाठ यांनी दिली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागBeedबीडleopardबिबट्या