शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गव्हावर घाटेअळी, तांबेराचा प्रादुर्भावाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:11 IST

ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात रबी हंगामात ३ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरा

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम रबीच्या पिकावर दिसून येत आहे. बदलत्या वातावरणाने हरभऱ्यावर घाटेअळी आणि इतर पिकांवर तांबेरा व अन्य किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच, गहू व हरभरा पिकांना थंडीची आवश्यकता असते मात्र, ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

यावर्षी रबी हंगामात ३ लाख ३३ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, हरभऱा पिकांवर घाटेअळी व गहू ज्वारी पिकांवर तांबेरा रोग पडण्याची शक्यता आहे. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज असून, फवारणीही करणे आवश्यक आहे. ढगाळ वातावरण असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो. त्यामुळे बुरशी नाशकाची फवारणी आवश्यक आहे. कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केले जात आहे. शिवाय, शेतकऱ्यांनीही पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे कामकाज कृषी विभागाकडून सुरु आहे. 

पाऊस झाल्यास पिकांना फायदाढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोठा पाऊस झाल्यास खरीप हंगामातील कापूस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात पाऊस झाल्यास रबी पिकांना फायदा होणार आहे. 

वातावरण बदलानुसार शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रबी हंगामातील पीक हाती लागावे यासाठी शेतकरी पिकांची काळजी घेत आहेत. मात्र, बदललेल्या वातावरणाचा फटका पिकांना बसणार असून, यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

असे आहे जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)ज्वारी    १५९७६९हरभरा    १३८०६७गहू    ३२५००मका    २८७९

ढगाळ वातावरणाचा हरभरा, गहू, ज्वारी, पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारणी करावी. यामुळे कीड व अळीचा प्रादुर्भाव रोखता होईल. - सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  (प्रभारी)  बीड

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीenvironmentपर्यावरण