शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटला; कॅबीनमध्ये दबल्याने क्लीनर जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:45 IST

आष्टी तालुक्यातील धामणगाव जवळील वळणावर घडली घटना 

ठळक मुद्देमृताच्या वडिलांचाही झाला होता अपघाती मृत्यू 

कडा :  धामणगावजवळ वळण रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटून कॅबीनमधील क्लीनरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० च्या दरम्यान घडली. श्रीकांत अंकुश माने (२६ ) असे मृताचे नाव असून तो आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील रहिवासी आहे. 

आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील चालक परसराम मिसाळ, व क्लिनर श्रीकांत माने हे दोघे कंटेनरमधून ( क्र. MH 46, AR. 3777 ) बीडकडे जात होते. धामणगावजवळ वळण रस्त्यावर झिंजुर्कॅ वस्ती नजीक चालक मिसाळ यांचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर उलटला. यात कॅबीनमधील क्लीनर श्रीकांत दबला गेल्याने जागीच मृत्यू झाला. श्रीकांतच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पोपट मंजुळे करीत आहेत. 

वडिलांचाही झाला होता अपघाती मृत्यू साधारण पाच वर्षांपूर्वी श्रीकांत यांच्या वडिलांचा पुण्याजवळ अपघात झाला होता. यानंतर घरची जबाबदारी श्रीकांतवर आली होती. सुरवातीला तो गावात गंवड्याच्या हाताखाली काम करायचा. मात्र दोन महिन्यांपासून तो कंटेनरवर क्लीनर म्हणून काम करत असे. घरातील कर्त्या पुरुषांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडDeathमृत्यू