शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही -पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 23:58 IST

जनतेच्या न्यायालयात मी स्वच्छ आणि निष्कलंक आहे, माझी प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही. परळीला जिल्हा न्यायालय यावे यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देवकील बांधवांशी संवाद : परळीला जिल्हा न्यायालय आणणार

परळी : जनतेच्या न्यायालयात मी स्वच्छ आणि निष्कलंक आहे, माझी प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही. परळीला जिल्हा न्यायालय यावे यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले.येथील वकील संघाच्या सभागृहात मंगळवारी शहरातील वकील बांधवांची बैठक झाली. यावेळी खा. डॉ. प्रितम मुंडे उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, वकील संघाने नेहमीच मला समर्थन दिलेले आहे. मी परळी मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला आहे. परळी ते अंबाजोगाई रस्ता रखडला आहे त्यात माझा दोष नाही. पण विरोधकांकडून काम रोखण्याचा प्रयत्न करून मला बदनाम केले जात असल्याचे त्या म्हणाल्या. तरीही या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. एक अपवाद सोडला तर गावोगावी रस्ते केले आहेत. विकास अगदी सर्व सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवला आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गट चळवळ गतीमान केल्याचे त्या म्हणाल्या.परळी न्यायालयासाठी आपण स्वतंत्र इमारत दिली, वकील संघासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला, तुमच्या नेतृत्वाची परळीला आज गरज आहे असे सांगत विकासकन्येला साथ देण्याचे अभिवचन शहरातील वकिलांनी दिले.यावेळी परळी वकील संघाचे अध्यक्ष पी.एम.सातभाई, अ‍ॅड.उषा दौंड, अ‍ॅड.प्रकाश मराठे,अ‍ॅड.मिर्झा, अ‍ॅड.दिलीप स्वामी, अ‍ॅड.नागापूरकर, अ‍ॅड. आर.व्ही.गित्ते.अ‍ॅड.टि.के.गोलेर अ‍ॅड.डि.पी.कडबाने, अ‍ॅड.राजेश्वर देशमुख, अ‍ॅड.प्रदीप गिराम,अ‍ॅड.अरु ण पाठक, अ‍ॅड.जगन्नाथ आंधळे अ‍ॅड लक्ष्मण अघाव, अ‍ॅड.दत्तात्रय आंधळे, अ‍ॅड.पोतदार, अ‍ॅड.संंध्या मुंडे, अ‍ॅड.कल्याण सटाले, अ‍ॅड.विकास टेकाळे, अ‍ॅड.मार्तंड शिंदे, अ‍ॅड.लक्ष्मण गित्ते, अ‍ॅड.ज्ञानोबा मुंडे, अ‍ॅड.अमोल सोंळके, अ‍ॅड.सुभाष गित्ते, अ‍ॅड.गजानन पारेकर, अ‍ॅड.प्रल्हाद फड, अ‍ॅड.सुनिल सोनपीर, आदी उपस्थित होते.माफियागिरीला विरोधकांकडून मिळतेय प्रोत्साहनमला भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त परळी करायची आहे. विरोधक हे माफियागिरीला प्रोत्साहन देतात. मी जनतेच्या न्यायालयात स्वच्छ आणि निष्कलंक आहे. जनताही माझ्यासोबत आहे.हीच बाब विरोधकांना सहन होत नसल्यामुळे माझ्या विरोधात अफवातंत्र वापरले जात आहे. खोटे बोल पण रेटून बोल या भूमिकेने ते माझ्या विरोधात अपप्रचार करतात. पण जनता त्यांची गुरु आहे.या निवडणुकीत परळीतील स्वाभिमानी जनता मलाच मताधिक्य देणार असल्याचे त्या म्हणाल्या. विकासाची चळवळ कायम ठेवून शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी भरभरून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी वकिलांनी चांगल्या नेतृत्वाच्या बाजूने राहून न्यायाची भूमिका घेऊन पंकजा मुंडे यांना साथ देण्याचे आवाहन केले. त्यास वकील बांधवांनी पाठिंबा दर्शविला.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडPankaja Mundeपंकजा मुंडेadvocateवकिल