शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची सतर्कता; दरोड्याच्या तयारीतील तिघे जेरबंद; दोघे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:51 IST

शहरातील कळंब रस्त्यावरील विठाई पूरम जवळील पापालाल लोहीया यांच्या लोखंडी दुकानाच्या पाठभिंतीला दडून बसलेले दरोडेखोर नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी जेरबंद केले.

ठळक मुद्देचोरटे कळंब तालुक्यातील : लोखंड चोरून नेण्यासाठी आणला दहा चाकी ट्रक

केज : शहरातील कळंब रस्त्यावरील विठाई पूरम जवळील पापालाल लोहीया यांच्या लोखंडी दुकानाच्या पाठभिंतीला दडून बसलेले दरोडेखोर नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी जेरबंद केले. यातील दोन आरोपी मात्र, फरार होण्यात यशस्वी झाले. ही घटना १३ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. पोलीस फारार आरोपींचा शोध घेत आहेत.केज शहरातील कळंब रस्त्यावरील पूर्व बाजूस असलेल्या विठाई पूरम कॉलनीजवळ पापालाल लोहीया यांनी नव्याने लोखंडी साहित्य मिळण्याचे दुकान सुरु केले आहे. या दुकानाच्या पाठीमागे १३ डिसेंबरच्या मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास पाच दरोडेखोर दडून बसले होते.हे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती केज पोलिसांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्रीच्या गस्तीवर असलेले केज पोलीस ठाण्याचे फौजदार विलास जाधव व चालक कादरी, मंदे, दोन होमगार्ड यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्वजण घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलीस आपल्यावर नजर ठेऊन आहेत, हे लक्षात येताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान फौजदार विलास जाधव व त्यांच्या सरकाऱ्यांनी यांनी शिताफीने पळून जाणाºया तीन दरोडेखोरांना सिनेस्टाईल पध्दतीने पकडले, तर इतर दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.या प्रकरणी फौजदार विलास जाधव यांच्या फिर्यादीवरून संजय राजेंद्र काळे (रा. मस्सा खंडेश्वरी, ता. कळंब), शंकर सुरेश काळे, शामसुंदर बिभीषण काळे (रा. अंधोरा, ता. कळंब), रुपेश रवींद्र काळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास एपीआय संतोष मिसळे हे करीत आहेत. केज पोलिसांनी क्षणाचा विलंब न लावता कारवाई केल्याने दरोडाच्या तयारीतील तीन दरोडेखोरांना वेळीच जेरबंद केले. या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे. तसेच गस्त वाढवण्याची मागणी देखील केली जात आहे.चटणीची पुडी, लोखंडी रॉड जप्तदरोडेखोरांनी दरोडा टाकताना कोणी समोर आले तर, त्याच्या डोळ््यात चटणी टाकून मारहाण करण्यासाठी लोखंडी टांबी, रॉड, काठी, कत्ती, खिळे ही हत्यारे आणली होती. ती ही पोलिसांनी जप्त केली. तसेच एक महागडा मोबाईल तीन दरोडेखोरांकडून ताब्यात घेतला आहे.माल नेण्यासाठी ट्रकदरोडेखोरांनी लोखंडाच्या दुकानातील सळया व इतर लोखंडी साहित्य चोरून घेऊन जाण्यासाठी ट्रक (एमएच १३ एक्स ३८९७ ) आणला होता.सर्व दरोडेखोर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहेत. या वस्तीमध्ये सराईत गुन्हेगार वास्तव्यास असल्याची देखील माहिती आहे.बीड पोलिसांकडून विविध गुन्ह्यातील आरोपी या परिसरातून अनेक वेळा जेरबंद केले अहेत.

टॅग्स :BeedबीडRobberyचोरीBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी