शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

' सिनेस्टाईल ' दागिने लंपास करणारे पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 16:02 IST

‘सिनेस्टाईल’ पद्धतीने लंपास करणाऱ्या दोन अट्टल लुटारूंच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देया प्रकरणी दोघांना बेड्या १५ दागिन्यासह दुचाकी जप्त

बीड : घरासमोर झाडू मारणाऱ्या व रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे दागिने दुचाकीवरून येत ‘सिनेस्टाईल’ पद्धतीने लंपास करणाऱ्या दोन अट्टल लुटारूंच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून १५ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. गुरूवारी ही कारवाई करण्यात आली.

शेख जुबेर शेख अब्दुल (२० रा.मसरतनगर) व अमीर खान अकबर खान (रा.इस्लामपुरा) अशी पकडलेल्या दोन लुटारूंची नावे आहेत. २० सप्टेंबर रोजी श्रीराम नगर भागात अश्विनी रमेश लाखे या घरासमोर झाडू मारत होत्या. याचवेळी हे दोघे तिथे दुचाकीवरून आले. आजुबाजुला कोणी नसल्याची संधी साधून त्यांनी लाखे यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पोबारा केला. भल्या पहाटे ही घटना घडल्याने दहशत निर्माण झाली होती.

त्यानंतर तात्काळ पोलिसांनी तपासाची चके फिरविली. शिवाजीनगर ठाण्याचे पोउपनि आर.ए.सागडे यांनी याचा तपास लावला. दोघांनाही ताब्यात घेऊन शिवाजीनगर ठाण्यात हजर केले. चौकशीत त्यांनी यापूर्वी एक गुन्हा केल्याची कबुली दिली. सध्या दोघेही पोलीस कोठडीत आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर पोनि शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सागडे व त्यांच्या पथकाने केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक