शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बालमनावर संस्कार रुजविण्यात बालभारतीचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:15 IST

पूर्वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी काळानुरूप बदलत गेली. आज नव्या रूपात बालभारतीने संस्कार रुजविण्याची पाऊलवाट निर्माण केली आहे. त्यामुळे बालमनावर मराठी साहित्याचे अंकुर रुजविण्याची मोठी जबाबदारी कवी, लेखक, शिक्षक व अधिकारी यांच्यावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शैक्षणिक उपक्रमासोबत अध्यापनात बदल घडवावेत, असा सूर ‘बालभारतीतील धडे’ या परिचर्चेतून निघाला.

ठळक मुद्देसाहित्य संमेलनात लेखक, कवी, विद्यार्थी, शिक्षक व अधिका-यांची परिचर्चा

भारत दाढेल ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई :पूर्वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी काळानुरूप बदलत गेली. आज नव्या रूपात बालभारतीने संस्कार रुजविण्याची पाऊलवाट निर्माण केली आहे. त्यामुळे बालमनावर मराठी साहित्याचे अंकुर रुजविण्याची मोठी जबाबदारी कवी, लेखक, शिक्षक व अधिकारी यांच्यावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शैक्षणिक उपक्रमासोबत अध्यापनात बदल घडवावेत, असा सूर ‘बालभारतीतील धडे’ या परिचर्चेतून निघाला.

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात सोमवारी बाबासाहेब परांजपे व्यासपीठावर लेखक, कवी, विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांनी चर्चेतून बालभारतीचा प्रवास, तसेच शिक्षणातील विविध प्रवाह या विषयावर चर्चा केली. या चर्चेत प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, केशव खटिंग, प्रकाश भुते, अर्चना पारीख व प्राजक्ता सोनवणे, ऋषिता लाहोटी, प्रसाद मुंडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या परिचर्चेची सुरुवात करताना सूत्रसंचालक तृप्ती अंधारे यांनी इंद्रजित भालेराव यांना बालभारती सोबतचा तुमचा प्रवास कसा झाला, हा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, पूर्वीच्या व आजच्या बालभारतीचे स्वरूप बदलले आहे. ज्या बालभारतीत भा.रा. तांबे यांची ‘सायंकाळची शोभा’ ही कविता होती, त्या पाचवीच्या पुस्तकात आता माझी ‘बाप’ ही कविता, तर जिथे बालकवींची ‘औदुंबर’ ही कविता होती, तिथे माझी ‘रविवार’ ही कविता अभ्यासाला आहे. त्या बालभारतीतील कविता मला ५० वर्षांनंतरही पाठ आहे. कविता न विसरण्याचे कारण म्हणजे त्या लयबद्ध होत्या. म्हणून विद्यार्थ्यांना ज्या कविता गोड वाटतील, आवडतील, त्याच कविता पुस्तकात असाव्यात. बालभारतीत समाविष्ट झालेल्या कवितेचा आनंद खूप मोठा असतो. मी कवितेवर आणि विद्यार्थ्यांनी माझ्या कवितेवर प्रेम केले, असेही ते म्हणाले.

दरम्यान, विद्यार्थिनी प्राजक्ता सोनवणे हिने आजचे बालसाहित्य वस्तुनिष्ठ आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर भालेराव म्हणाले, माझे साहित्य वस्तुनिष्ठ आहे; परंतु बालवयात मुलांना फार मोठे वास्तव सांगायचे नसते. त्यामुळे त्यांंना झेपेल एवढेच वास्तव साहित्यात असावे. ऋषिता लाहोटी हिने तुम्ही शेतकरी कुटुंबात जन्माला आला नसता तर शेतकºयांवर कविता लिहिली असती का, असा प्रश्न विचारला. त्यावर भालेराव यांनी मी जे जगले, भोगले आहे, ते माझ्या कवितेतून मांडले आहे. मी जर शेतकरी कुटुंबात जन्मलो नसतो, तर मला शेतकºयांचे दु:ख कळाले नसते आणि मी शेतकºयांवर कविताही लिहिली नसती.

आजकालची मुले मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. त्याबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली. तृप्ती अंधारे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा संतुलित वापर करून आपले ज्ञान वाढविले पाहिजे. ज्योती कदम यांनी बालसाहित्यिकांची जबाबदारी वाढली असून, योग्य संस्कार करणारे साहित्य लिहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

लेखकांची विद्यार्थ्यांसोबत भेट घडवाअध्यापनातील बदलाबद्दल केशव खटिंग म्हणाले, बालभारतीतील धडे हा आस्थेचा विषय आहे. आताचे कवी, लेखक विद्यार्थ्यांना पाहण्यास मिळतात. पूर्वी मात्र तसे होत नव्हते. शिक्षकांनी जे अभ्यासक्रमाला लेखक आहेत, त्यांचे साहित्य वाचून अशा लेखकांची भेट विद्यार्थ्यांसोबत घडवली पाहिजे. ज्याप्रमाणे बालभारतीतील धडे बदलतात, अगदी तसेच आपणही अध्यापन पद्धतीतही बदल केले पाहिजेत. शिक्षकांनी बोलीभाषेत कविता शिकवली पाहिजे. पुस्तकांचे सामूहिक वाचन केले पाहिजे, आदी उपक्रमांचीही त्यांनी चर्चा केली.

सात कोटी विद्यार्थ्यांनी पाठ केली ‘बाप’ कविताप्रा. इंद्रजित भालेराव यांनी आपल्या मनोगतात ‘बाप’ ही कविता सात कोटी पोरांनी पाठ केल्याचे सांगितले. माझी कविता केवळ शाळेतील विद्यार्थीच नव्हे, तर वाडी-वस्ती तांड्यावरची मुलेसुद्धा पाठ करतात, याचे उदाहरणही त्यांनी दिले. यावेळी ‘बाप’, तसेच ‘काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता’ ‘शिक पोरा शिक, लढायला शिक’ या कविता सादर केल्या. या परिचर्चेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन