माजलगाव
: सुमारे १० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मागील तीन वर्षांपासून फरार परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचा चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे मंगळवारी येथील न्यायालयात स्वतः शरण आला. त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे हे करोडो रुपयांचा अपहार करून मागील तीन वर्षांपासून फरार होता. त्यांनी मल्टीस्टेटच्या १३ शाखा सुरू केल्या होत्या, तर एक सहकारी पतसंस्था होती. ही मल्टीस्टेट ज्यादा व्याजदर देत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर येथे ठेवी ठेवल्या होत्या. या ठिकाणी मोठा अपहार झाल्याने मागील तीन वर्षांपासून चेअरमन अलझेंडे फरार होता.
त्याच्यावर १३ ठिकाणी अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मंगळवारी ४ वाजता अलझेंडे हा येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयात स्वतः होऊन हजर झाला.
अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधिश अरविंद वाघमारे यांच्या न्यायालयाने अलझेंडे याची २३ तारखेपर्यंत जिल्हा तुरूंगात रवानगी केली.
परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये करोडो रूपयांचा अपहार झाल्यानंतर अनेक पेन्शनधारक रस्त्यावर आले तर अनेकांच्या मुला- मुलींचे लग्न मोडले. विजय उर्फ भारत अलझेंडे हा न्यायालयाला शरण आल्याने या ठिकाणच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
===Photopath===
090321\purusttam karva_img-20210309-wa0028_14.jpg
===Caption===
विजय अलझेंडे मंगळवारी माजलगाव येथील न्यायालयात स्वत: शरण आला.