शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"चाहुर चाहुर चांग भलं..."; पोळ्यानिमित्त कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून ग्रामगीत गात बैलांचे पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 18:20 IST

कृषिमंत्री धनंजय मुंडें यांनी जन्म गावी पोळा सण साजरा केला; मराठवाड्यातील अतिवृष्टीवर ऑनलाइन बैठकां घेत केल्या सूचना

परळी वैद्यनाथ (बीड) : कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथरा (ता. परळी वै. ) येथे आज शेतकऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा सण पोळा साजरा केला. विशेष म्हणजे, शेतातील बैल जोड्यांचे कुटुंबीयांसमवेत पूजन करताना "चाहुर चाहुर चांग भलं, पाऊस आला घरला चला" अशा आशयाचे ग्रामगीत स्वतः धनंजय मुंडे हे गुणगुणत होते. त्यानंतर मंत्री मुंडे यांनी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीसंबंधी दोन ऑनलाइन बैठकांना मार्गदर्शन करत सूचना केल्या.

देशाच्या समृद्ध कृषी परंपरेमध्ये बळीराजाच्या सोबतीने किंबहुना बळीराजाच्या बरोबरीने कष्ट उपसणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा हा सण असून या निमित्ताने राज्यातील समस्त शेतकरी बांधवांना आपण शुभेच्छा देतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या प्रसंगी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, बंधू अजय मुंडे व अभय मुंडे यांसह आदी उपस्थित होते.

बैलपोळ्याच्या निमित्ताने मराठवाड्यात बैलांची पूजा करताना पाऊस आल्याची चाहूल लागल्याचे एक खास गीत म्हटले जाते, "चाहुर चाहुर चांग भलं, पाऊस आला घरला चला" अशा आशयाचे हे ग्रामीण गीत बैलजोड्यांचे पूजन करताना स्वतः धनंजय मुंडे सुद्धा हे म्हणताना पाहायला मिळाले. यावेळी मुंडे यांनी बैलजोड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवत त्यांच्या कष्टप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तत्काळ पंचनामे करादरम्यान, बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आजच कृषी विभागाच्या दोन बैठकांनाही ऑनलाईन मार्गदर्शन केले. मागील दोन-तीन दिवसापासून बीड जिल्ह्यासह राज्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचाही ऑनलाइन बैठकीत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मनुष्यहानी, पशुहानी होणार नाही, या पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणाना दिल्या आहेत.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड