शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत कपाशीला पाने दिसली असती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:05 IST

‘मृगाला बरसला असता तर कपाशी दोन पानांवर दिसली असती, आणि पुढची पिके घ्यायला सोपे गेले असते’, अशा प्रतिक्रिया लांबलेल्या पावसाबद्दल शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील सहा महिन्यांपासून टंचाई आणि दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बीड जिल्ह्याला यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा होती. परंतू जूनचे १९ दिवस झालेतरी पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘मृगाला बरसला असता तर कपाशी दोन पानांवर दिसली असती, आणि पुढची पिके घ्यायला सोपे गेले असते’, अशा प्रतिक्रिया लांबलेल्या पावसाबद्दल शेतकरी व्यक्त करत आहेत.मागील वर्षी सरारीच्या तुलनेत ५० टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे खरिपाबरोबरच रबीचा हंगामही वाया गेला. डिसेंबरपासून ग्रामीण भागात पाणी टंचाई सुरु झाली. उन्हाळ्यातील चार महिने दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. तापमानही ४४ अंशापर्यंत गेल्याने यंदाचा उन्हाळा असह्य झाला. त्यामुळे जून कधी येतो आणि पाऊस कधी बरसतो, याची प्रत्येक जण चातकाप्रमाणे वाट पाहत होता. ६-७ जूनदरम्यान मान्सूनपूर्व पावसाने किरकोळ स्वरुपात हजेरी लाली तरीही आशा उंचावल्या होत्या.खरिप हंगामाची तयारी सुरु केली. मशागती आटोपल्या, मात्र पाऊस नसल्याने शोतकरी चिंतेत आहेत. १९ जूनपर्यंत पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील वर्षीदेखील २० जूनपासून पेरण्या सुरु झाल्या होत्या.मात्र, यंदा १९ जूनपर्यंत पूरक पाऊसच झालेला नसल्याने २० जूनपासून पेरण्यांची आशाही मावळली आहे. त्यात मूग, उडदाचा विषय संपलेला आहे. हवामान खात्याच्या अनुमानानुसार २२ पासून चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जर तसे झाले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पेरण्या सुरु होऊ शकतात.पाऊस लांबल्याने उत्पादकतेवर परिणाम१ ते १९ जूनदरम्यान मृगाचा पाऊस झाला असता तर कपाशी, मूग, उडदाची लागवड पूर्ण झाली असती. या पावसामुळे सोयाबीन, तूर, मका, बाजरीला पोषक वातावरण राहिले असते. मात्र पाऊस लांबल्याने सोयाबीन, तूर पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :cottonकापूसMonsoon Specialमानसून स्पेशलdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र