शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत चोरट्याच्या हल्ल्यात व्यापारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:01 IST

गेवराई : शहरातील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या एका जणावर चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये सदरील इसम ...

ठळक मुद्देपोलिसांचा धाक राहिला नाही; चोरींच्या घटनांमध्ये वाढ

गेवराई : शहरातील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या एका जणावर चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये सदरील इसम गंभीर जखमी झाला असून, आरडाओरड झाल्याने याठिकाणाहून चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.येथील कापड व्यापारी अब्दुल शफिक अब्दुल कादर यांचे शास्त्री चौकात कपड्याचे शोरुम असून ते मोमीनपुरा भागात वास्तव्यास आहेत. दरम्यान ८ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता एका चोरट्याने अब्दुल शफिक यांच्या घरात प्रवेश केला. याच दरम्यान शफीक यांना जाग आली असता, त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावर चोरट्यांनी हातात असलेल्या शस्त्राने हल्ला चढवला. अब्दुल यांनी आरडाओरड केल्यामुळे चोरट्याने तेथून पोबारा केला. या हल्ल्यात अब्दुल शफिक हे गंभीर जखमी झाले असून, नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पंचनामा केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.चोरट्यांची दहशतगेवराई शहरात प्रत्येत दीड-दोन महिण्याच्या ठराविक अंतराने चोरटे विविध ठिकाणी हल्ला करत जबरी चोरी करतात किंवा प्रयत्न करतात. चोरी, घरफोडी, दरोड्याच्या घटना घडत असताना गेवराई पोलिसांना तपास मात्र लागलेला नाही. विशेष करून मागील तीन-चार महिण्याच्या कालावधीत चार चोरीच्या घटना या मोमीनपुरा, धनगरगल्ली भागात घडलेल्या आहेत. या भागातील नागरिक मोठ्या दहशतीखाली असतानाच शनिवारी पुन्हा चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने अब्दुल शफिक यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.आमदारांनी काढला होता मोर्चागेवराई मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी वाढत्या चोरी, दरोडे, हल्ला व इतर गुन्ह्यांमधील होत असलेल्या वाढ यावर पोलिसांकडून हो नसलेली योग्य कारवाई व प्रतिबंधात्मक उपापयोजना या विरोधात हजारो लोकांचा मोर्चा काढला होता. यानंतर पोलीस ठाणे प्रमुख देखील बदलण्यात आले होते. मात्र, तरी देखील चोरी व इतर गुन्हे घडत आहेत. पोलिसांनी योग्य उपायोजना करून चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीPoliceपोलिस