लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनावर प्रतिबंध लागावा यासाठी लॉकडाऊन केले. त्यामुळे लालपरी अनेक महिने जागेवरच उभा होती. आता अनलॉकनंतर बसेस पुन्हा सुसाट धावत आहेत. यात बीडमधून परळी, औरंगाबाद आणि परभणी या मार्गावर प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. असे असले तरी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना सुविधा दिल्या जात नसल्याचेही समोर आले आहे.
जिल्ह्यात आठ आगार आहेत. प्रत्येक आगारातून आता बसेस सुसाट धावत आहेत. प्रवाशांकडून जसाजसा प्रतिसाद मिळेल, तसतशा बसेसची संख्या वाढविली जात आहे. सध्या तरी शहरांच्या ठिकाणीच बसेस जास्त धावत आहेत. ग्रामीण भागातील बसेस अद्यापही बंदच असल्याचे दिसते. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यास ग्रामीण भागातही बसेस धावण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्या सुरू करण्याचीही मागणी होत आहे.
...
२४ टक्के बसेस अद्यापही आगारातच
जिल्ह्यात अद्यापही १२८ बसेस आगारातच उभ्या आहेत. याची टक्केवारी २४ एवढी आहे. या बसेसला अद्यापही प्रवाशांची प्रतीक्षा आहे. असे असले तरी पूर्वीपेक्षा परिस्थिती बदलत असल्याचे दिसते.
..
औरंगाबादला सर्वाधिक गर्दी
बीड आगारातून औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांची जास्त गर्दी होत आहे. त्यापाठोपाठ परभणीचा क्रमांक लागतो. या मार्गावर वडवणी, तेलगाव, माजलगाव, पाथरी हे मोठे शहर असल्याने प्रवासी संख्या अधिक आहे.
..
माझा मास्क आताच खाली आला आहे. गर्दी नव्हती म्हणून थोडा बाजूला केला. सारखा घातल्यास खूप घाम येतो. आता यापुढे मास्क नियमित व योग्य पद्धतीने वापरेल. एवढ्या वेळेस चूक झाली माफ करा.
-गणेश पंडित, औरंगाबाद
..
मला मास्क आहे. परंतु फिजिकल डिस्टन्सिंग कसे ठेवणार. रांगेत उभा राहून बसमध्ये जावे तर तोपर्यंत जागा जाईल. मग नाईलाजास्तव गर्दी करून धक्के देत बसमध्ये जावे लागते. गर्दी टाळण्याची महामंडळाने उपाययोजना कराव्यात.
- अंबादास भोजणे, परभणी
090821\174509_2_bed_29_09082021_14.jpeg
बीड बसस्थानकात बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची झालेली गर्दी दिसत आहे.