गेवराईत घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा जळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 08:48 PM2018-12-05T20:48:36+5:302018-12-05T20:49:19+5:30

शहरातील साठे नगर भागातील घराला आग लागुन  महीलेचा जागीच मृत्यु झाला. ही घटना बुधवारी पाहाटेच्या सुमारास घडली.

The burning of an elderly woman in a burnt fire in Geewrai house burns | गेवराईत घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा जळून मृत्यू

गेवराईत घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा जळून मृत्यू

Next

गेवराई (बीड )  : शहरातील साठे नगर भागातील घराला आग लागुन  महीलेचा जागीच मृत्यु झाला. ही घटना बुधवारी पाहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात नोंद झाली नव्हती.

पुंजाबाई नाथा कापसे (८०, धोंडराई ह.मु. साठेनगर, गेवराई) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री घराला अचानक आग लागली. घरात झोपलेल्या पुंजाबाई यांना काही कळण्याआतच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत त्यांचा भाजून जागीच मृत्यू झाला. परिसरातील काही नागरीकांना घरामधुन धुर निघत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी धाव घेतली. पाहणी केल्यावर घरातील साहित्यासह वृद्ध महिलाही आगीत भाजल्याचे दिसले. घटनेची माहिती समजल्यानंतर गेवराई पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून गेवराई ठाण्यात अद्याप याची नोंद झालेली नाही.
 

Web Title: The burning of an elderly woman in a burnt fire in Geewrai house burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.